चेहऱ्यावरील केस काढणे, आयब्रो करणे किंवा अप्परलिप्स करणे हे मुलींच्या रुटीनचा भाग झाले आहे. थ्रेडींग, वॅक्सिंग किंवा प्लकिंग यामुळे चेहऱ्याचा लुक नक्कीच सुंदर दिसतो, पण या प्रक्रियेनंतर त्वचा संवेदनशील होते. (If you don't take care of your skin after removing facial hair, your skin will become dry, dull and ugly. Here's what to do.)सूक्ष्म जखमा, ताण, लालसरपणा किंवा सौम्य सूज ही नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. त्यामुळे केस काढल्यावर योग्य काळजी घेणे खूप महत्त्वाचे ठरते.
थ्रेडींगदरम्यान केस मुळासकट खेचला जातो. या क्षणी त्वचेवर अतिशय बारीक ओरखडे निर्माण होतात. त्यामुळे त्वचा काही वेळ गरम, कोरडी किंवा चुरचुरीत वाटू शकते. केसांच्या रोमकूपांवर ताण पडल्याने त्या जागी थोडी लालसरता येते. काही वेळा त्वचा नाजूक असल्यास फुगवटाही तयार होतो. म्हणूनच उपचारानंतर त्वचेला शांत, ओलसर आणि थंडावा देणारी काळजी अत्यंत गरजेची आहे.
सुरुवातीला चेहरा थंड पाण्याने हलकेच धुतला की त्रास कमी होतो. त्यानंतर कोरफडीचा अर्क हा यामध्ये सर्वात प्रभावी ठरतो. तो त्वचेचा दाह कमी करतो. लालसरपणा कमी करतो आणि त्वचेला लगेच शांत करतो. त्याचा थंडावा आणि हायड्रेशन यामुळे रोमकूप बंद होण्यास मदत होते. काहींना कोरडेपणा लवकर जाणवतो. चेहऱ्यावर तेल लावणे फायद्याचे ठरते. खोबरेल तेल किंवा बदाम तेल हे सौम्य असल्याने त्वचेवर सहज पसरते. हे तेल रोमकूपात अडकलेले ताण कमी करते आणि त्वचेला पोषण देते. गरज वाटल्यास रात्री झोपण्यापूर्वी थोडे तूपही लावता येते. तूप त्वचेला मऊपणा देतं, चुरचुर शांत करतं आणि त्वचेवर एक संरक्षण कवच तयार होतं.
मॉइश्चराइझर लावणे ही सर्वात महत्त्वाचा पायरी आहे. केस काढल्यावर त्वचा काही तासांसाठी ओलावा पटकन गमावते. त्यामुळे क्रीम किंवा लोशन लाऊन ओलसरपणा टिकवून ठेवला की त्वचा लवकर चांगली होते. कोरफड, कॅलेंड्युला किंवा व्हिटॅमिन-ई असलेले मॉइश्चराइझर विशेषतः उपयुक्त ठरतात.
केस काढल्यानंतर एक-दोन तास मेकअप न लावणे, सूर्यप्रकाशापासून दूर राहणे आणि त्या जागेवर वारंवार हात न लावणे हीही महत्त्वाचे आहे. तसेच लगेच गरम पाण्याने चेहरा धुणे, स्टीम घेणे किंवा स्क्रब करणे टाळावे. त्वचेला शांती हवी असते. स्क्रब किंवा जास्त चोळल्याने त्वचा आणखी संवेदनशील होते. योग्य काळजी घेतली तर थ्रेडींगनंतरची संवेदनशीलता लवकर कमी होते आणि त्वचा पुन्हा मऊ, स्वच्छ आणि आरामदायी वाटते.
