Join us

तुझ्यासाठी कायपण! ट्रेनमध्ये बायकोच्या पायांना नेलपेंट लावत होते काका; व्हिडिओ पाहून लोक म्हणाले.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 12:35 IST

Husband applying nail polish on his wife toes : हे जोडपे रेल्वेच्या डब्यात दोन वेगवेगळ्या सीटवर बसलेले दाखवले आहे. तिचा नवरा ज्या सीटवर बसला आहे त्या सीटवर ती महिला पाय ठेवून बसलेली आहे. तो तिच्या पायाच्या बोटांवर काळजीपूर्वक नेलपॉलिश लावताना दिसत आहे.

पती पत्नीचं (Husband Wife Relationship) नात असं असतं ज्यात प्रेम, सन्मान यांसह वाद विवादही खूप असतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. ज्यात पती पत्नीची रोजची भांडणं दाखवली जातात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला नवरा बायकोच्या नात्याचा व्हिडिओ पाहून तुमचंही मन भरून येईल. इतका प्रेम नवरा तुम्ही या आधी कधीही पाहिला नसेल.  हा माणूस त्याच्या पत्नीच्या पायांना अतिशय प्रेमानं नेलपेंट लावून देत असल्याचं दिसंतय. (Husband applying nail polish on his wife toes while sitting in the train internet loves it see viral vide०) 

व्हिडिओमध्ये दोघेही ट्रेनमध्ये बसलेले दिसत आहेत. पती पत्नीच्या पायाच्या बोटांवर नेलपॉलिश लावताना दिसत आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्राम यूजर दिलीप सोलंकी यांनी शेअर केला आहे. व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओने इंटरनेट युजर्सचे हृदय पिळवटून टाकले आहे.

हे जोडपे रेल्वेच्या डब्यात दोन वेगवेगळ्या सीटवर बसलेले दाखवले आहे. तिचा नवरा ज्या सीटवर बसला आहे त्या सीटवर ती महिला पाय ठेवून बसलेली आहे. तो तिच्या पायाच्या बोटांवर काळजीपूर्वक नेलपॉलिश लावताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक या व्हिडिओच्या प्रेमात पडले आहेत. पती-पत्नीमधील असे प्रेम पाहून सर्वांनाच आनंद होतो. लोक कमेंट विभागात हार्ट  आणि लव्ह इमोजी पोस्ट करत आहेत. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया