Neck Darkness : चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी आपण सगळेच वेगवेगळे उपाय करत असतो. पण चेहऱ्याची काळजी घेण्याच्या नादात आपण मानेकडे दुर्लक्ष करतो. ज्यामुळे मानेवर काळे डाग पडतात, काळपटपणा वाढतो, त्वचाही डल दिसते. बरेच लोक यासाठी देखील अनेक उपाय करतात. त्यातील एक उपाय म्हणजे टूथपेस्ट. अनेक लोक दावा करतात की, टूथपेस्ट लावून मानेवरील काळपटपणा आणि डेड स्किन दूर केली जाऊ शकते. पण मग यासाठी टूथपेस्टचा वापर कसा करावा? हेच आज आपण पाहणार आहोत.
टूथपेस्ट आणि लिंबाचा रस
जर आपल्या मानेवर काळपटपणा जमा झाला असेल तर टूथपेस्ट आणि लिंबाचा रस मिक्स करून लावावा. लिंबाच्या रसामध्ये नॅचरल ब्लीचिंग एजंट आहे, ज्याने मानेवरील काळा थर कमी होऊ शकतो. इतकंच नाही तर टूथपेस्टमधील बेकिंग सोडा देखील मानेला एक्सफोलिएट आणि क्लीन करण्यास मदत करतो. यासाठी दोन चमचे टूथपेस्ट घ्या आणि त्यात थोडा लिंबाचा रस घाला. ही पेस्ट मानेवर लावा आणि २० मिनिटांनी धुवून टाका. त्यानंतर त्वचेवर मॉइश्चरायजर लावा.
टूथपेस्ट आणि मध
मानेचा काळपटपणा घालवण्यासाठी टूथपेस्ट आणि मधाचं मिश्रण सु्द्धा गुणकारी ठरू शकतं. हा उपाय करण्यासाठी दोन चमचे टूथपेस्टमध्ये एक चमचा मध टाकून मानेवर लावा. मधाने त्वचा हायड्रेट राहते. तर टूथपेस्टमधील तत्व मान साफ करतात. चांगल्या रिझल्टसाठी आपण ही पेस्ट आठवड्यातून २ ते ३ वेळा वापरू शकता. याने त्वचेची रंगत वाढेल.
टूथपेस्ट आणि दही
मानेची ही समस्या दूर करण्यासाठी टूथपेस्ट आणि दही सुद्धा वापरू शकता. दह्यातील लॅक्टिक अॅसिड मानेला एक्सफोलिएट करतं आणि त्वचा साफ होते. यासाठी आपण दोन चमचे टूथपेस्ट घ्या आणि त्यात दही मिक्स करा. ही पेस्ट मानेवर लावा आणि अर्धा तास तशीच ठेवा. नंतर मान साध्या पाण्याने धुवा. मानेची त्वचा साफ होईल. काही दिवस हा उपाय केल्यास फरक दिसून येऊ शकतो.
