Join us

कोरफडीच्या गरानं धुवा चेहरा, ४ पद्धतींनी मिळवा एक रुपया खर्च न करता चमकदार चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 17:09 IST

How To Clean Face With Aloe Vera: तुम्ही कोरफडीचा वापर चेहरा धुण्यासाठीही करू शकता. पण अनेकांना अजूनही कोरफडीचा वापर कसा करावा हे माहीत नसतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

How To Clean Face With Aloe Vera: कोरफड त्वचेची काळजी घेण्यासाठी भरपूर वापरली जाते. इतकंच नाही तर केसांच्या अनेक समस्या सुद्धा यानं दूर होतात. कोरफडमधील अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट्स त्वचेचा फ्री रॅडिकल्सपासून बचाव करतात. तसेच त्वचा आतपर्यंत साफ करण्यास मदत मिळते. त्वचेवरील डाग, पिंपल्स, ब्लॅकहेड्स आणि पिगमेंटेशनही दूर होते. तुम्ही कोरफडीचा वापर चेहरा धुण्यासाठीही करू शकता. पण अनेकांना अजूनही कोरफडीचा वापर कसा करावा हे माहीत नसतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कोरफड आणि व्हिटामिन ई कॅप्सूल

कोरफडीच्या गरात व्हिटामिन ई कॅप्सूल ऑइल मिक्स करून चेहरा धुवू शकता. यासाठी कोरफडीचा २ चमचे गर घ्या. त्यात व्हिटामिन ई कॅप्सूल ऑइल मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि २ ते ३ मिनिटं हलक्या हातानं मसाज करा. यानं त्वचेमध्ये ब्लड सर्कुलेशन वाढेल आणि त्वचा ग्लो करेल. व्हिटामिन ई कॅप्सूलमध्ये मॉइश्चरायजिंग गुण असतात, जे त्वचेला ओलावा देतात. तसेच त्वचा आतपर्यंत साफ होते, तसेच रोमछिद्रेही मोकळे होतात.

कोरफड आणि ग्लिसरीन

चेहरा धुण्यासाठी तुम्ही कोरफड आणि ग्लिसरीनही मिक्स करू शकता. ग्लिसरीननं चेहरा मुलायम बनते. यासाठी २ चमचे कोरफडीचा गर घ्या आणि त्यात ग्लिसरीन मिक्स करा. नंतर चेहऱ्यावर लावा. थोडा वेळ मसाज करा आणि अर्ध्या तासानंतर पाण्यानं चेहरा धुवा. त्वचेवर नॅचरल ग्लो दिसेल.

कोरफड आणि बेसन

कोरफड आणि बेसन मिक्स करूनही चेहरा धुवू शकता. यासाठी २ चमचे बेसन घ्या. त्यात कोरफडीचा गर मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. ३० ते ३५ मिनिटांनंतर साध्या पाण्यानं चेहरा धुवा. या मिश्रणानं चेहरा चांगलं साफ होतो आणि मळ-माती निघून जाते.

कोरफड आणि हळद

चेहरा धुण्यासाठी तुम्ही कोरफड आणि हळदीचं मिश्रणही वापरू शकता. यासाठी तुम्ही २ चमचे कोरफडीचा गर घ्या. त्यात थोडी हळद मिक्स करा आणि चेहऱयावर लावा. २ ते ३ मिनिटं चेहऱ्याची हलकी मसाज करा. यानं त्वचेवरील डेड स्किन निघून जाईल. तसेच चेहऱ्याचा ग्लो सुद्धा वाढेल.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स