Skin Care : थंडीत गार वाऱ्यामुळे त्वचा अनेकदा ड्राय होते, फाटते, कोमेजलेली दिसते. वेगवेगळ्या केमिकल्सचा प्रभाव काही वेळच टिकतो. त्यामुळे त्वचा पुन्हा पुन्हा कोरडी होते. त्वचेवर खाज येते. अशात या दिवसांमध्ये चेहऱ्याची काळजी घेणं फारच अवघड आणि डोकेदुखीचं काम होतं. अशात यावर समस्येवर एक सोपा उपाय ट्राय करू शकता. जर रात्री झोपण्याआधी आपण चेहऱ्यावर व्हिटामिन ई लावाल तर चेहरा दिवसभर मुलायम आणि फ्रेश दिसेल. पाहुयात याचा वापर कसा कराल आणि याचे काय फायदे मिळतात.
व्हिटामिन ई चे फायदे
कोरडेपणा होईल दूर
व्हिटामिन ई चा वापर केल्याने त्वचा लवकर ड्राय होत नाही. कारण हे एक चांगलं मॉइश्चरायजर आहे. जे त्वचेला खोलवर हायड्रेट करतं. ओलावा कायम ठेवण्यास आणि त्वचेचा लिपिड बॅरिअर मजबूत करण्यास मदत करतं. ज्यामुळे त्वचा मुलायम होते.
डागही जातील
व्हिटामिन ई ने त्वचेसाठी सगळ्यात आवश्यक कोलेजन बूस्ट होतं. सोबतच त्वचा टाइटही होते. तसेच याने ब्लड सर्कुलेशन सुधारतं, ज्यामुळे त्वचेचं टेक्स्चर चांगलं राहतं. इतकंच नाही तर चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासही याने मदत मिळते.
सुरकुत्या होतील दूर
व्हिटामिन ई ने फाइन लाइन्स आणि सुरकुत्यांपासून सुटका मिळते. कमी वयात आलेल्या सुरकुत्या लगेच दूर होतात. चेहऱ्यावर दिसणारी म्हातारपणाची लक्षणं कमी होतात. त्वचेला आतून पोषण मिळतं, ज्यामुळे चेहरा चमकदार सुद्धा होतो.
कसा कराल वापर?
व्हिटामिन ई कॅप्सूल खोबऱ्याच्या किंवा बदामाच्या तेलात मिक्स करून लावायची आहे. रात्री झोपण्याआधी १ चमचा खोबऱ्याचं तेल किंवा बदामाचं तेल घ्या. त्यात व्हिटामिन ई घाला. दोन्ही गोष्टी चांगल्या मिक्स करा. नंतर हलक्या हाताने चेहऱ्यावर लावून मसाज करा. मसाज करण्याआधी चेहरा चांगला धुवावा. नंतर हे मिश्रण लावून १५ ते २० मिनिटं मसाज करावी. सकाळी झोपेतून उठल्यावर नॉर्मल पाण्याचे चेहरा धुवावा.
