Lokmat Sakhi >Beauty > गुडघे आणि हाताच्या कोपरांचा काळपटपणा लगेच होईल दूर, टोमॅटोचा ‘हा’ खास उपाय करा

गुडघे आणि हाताच्या कोपरांचा काळपटपणा लगेच होईल दूर, टोमॅटोचा ‘हा’ खास उपाय करा

Nees and elbows Darkness Home Remedy : जास्त घाम, डेड सेल्स जमा झाल्यानं आणि आधीच त्वचेची योग्य काळजी न घेतल्यानं या समस्या होतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 15:25 IST2025-08-28T15:11:33+5:302025-08-28T15:25:32+5:30

Nees and elbows Darkness Home Remedy : जास्त घाम, डेड सेल्स जमा झाल्यानं आणि आधीच त्वचेची योग्य काळजी न घेतल्यानं या समस्या होतात.

How to use tomato tan pack to remove darkness of knees and elbows | गुडघे आणि हाताच्या कोपरांचा काळपटपणा लगेच होईल दूर, टोमॅटोचा ‘हा’ खास उपाय करा

गुडघे आणि हाताच्या कोपरांचा काळपटपणा लगेच होईल दूर, टोमॅटोचा ‘हा’ खास उपाय करा

Nees and elbows Darkness Home Remedy : अनेकदा आपण बघतो की, काही लोकांचे हात-पाय तर साफ किंवा उजळ असतात. पण त्यांचे गुडघे, हाताची कोपरं काळपट दिसतात. त्यामुळे अनेकदा महिलांना आपल्या आवडीचे कपडेही घालता येत नाहीत. कारण त्वचा काळवंडलेली दिसेल. कालांतराने तर या त्वचेच्या या भागांवरील काळपटपणा अधिक वाढतो. 

जास्त घाम, डेड सेल्स जमा झाल्यानं आणि आधीच त्वचेची योग्य काळजी न घेतल्यानं या समस्या होतात. हाच काळपटपणा दूर करण्यासाठी महिला वेगवेगळे प्रॉडक्ट वापरतात, ज्यांची किंमतही भरपूर असते. अशात एक खास घरगुती उपाय करू शकता. ज्यामुळे त्वचेवरील टॅनिंग दूर होऊ शकते. महत्वाची बाब म्हणजे याचे काही साइड इफेक्ट्सही नाहीत.

टॅनिंग दूर करणारा उपाय

त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी आपल्याला टोमॅटो, कॉफी, तांदळाचं पीठ, दही आणि लिंबाची गरज भासेल.

आता टोमॅटो बारीक करा. त्यात थोडी कॉफी मिक्स करा. सोबतच तांदळाचं पीठ देखील मिक्स करा. नंतर त्यात दही आणि लिंबाचा रस घाला. या गोष्टी चांगल्या मिक्स करून घ्या. नंतर ही पेस्ट काळपटपणा असलेल्या त्वचेवर लावा. 10 ते 15 मिनिटं ही पेस्ट तशीच ठेवा. नंतर गुलाबजलानं त्वचा साफ करा. पुढे कपड्यानं पुसा आणि नंतर पाण्यानं त्वचा साफ करा.

टोमॅटोचा कसा मिळतो फायदा?

टोमॅटोमध्ये फ्लेवोनॉइड्स आणि पेक्टिन असतात. हे तत्व एक्सफोलिएट करण्यास मदत करतात. सोबतच त्वचेतही सुधारणा होते. इतकंच नाही तर यातील अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट त्वचेवरील डेड सेल्सही दूर होतात. तसेच, टोमॅटोमध्ये व्हिटामिन सी आणि लायकोपीनही असतं. जे त्वचेचं नुकसान होण्यापासून टाळतात. हा उपाय नियमितपणे केल्यास नक्कीच फायदा मिळू शकतो.

Web Title: How to use tomato tan pack to remove darkness of knees and elbows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.