Lips Dead Skin Home Remedy : आठवड्यातील सगळे दिवस ओठ मुलायम राहतील असं होत नाही. काही दिवस ओठ रखरखीत, फाटलेले आणि निर्जीव दिसतात. याचं कारण असतं ओठांवर जमा झालेली डेड स्किन. या डेड स्किनमुळे ओठांचं सौंदर्य कमी होतं. अनेकदा लिप बाम लावून किंवा आणखीही काही लावून ओठ मुलायम राहत नाहीत. कारण ओठांवर जमा झालेली डेड स्किन त्यांना मॉइश्चर होऊ देत नाही. उन्हाळ्यात तर डेड स्किनची समस्या अधिक होते. अशात यावर एक खास उपाय आपल्या किचनमध्येच लपला आहे. तो म्हणजे साखर आणि मध. ओठांवरील डेड स्किन गायब करून ओठ मुलायम करण्यासाठी हा उपाय सगळ्यात बेस्ट मानला जातो.
साखर आणि मध ओठांसाठी वरदान
साखर नॅचरल एक्सपोलिएटर सारखी काम करते. साखरेचे छोटे दाणे ओठांवरील डेड स्किन म्हणजे मृत त्वचा हळूहळू काढण्यास मदत करतात. तर दुसरीकडे मध एक नॅचरल मॉइश्चरायजर आहे. जे ओठांना खोलवर हायड्रेट ठेवतं आणि त्यांना मुलायम बनवतं. या दोन्हींच्या मिश्रणाने ओठांचा कोरडेपणा कमी होतो आणि सोबतच ओठांना टवटवीत लूकही मिळतो.
कसा कराल वापर?
एका छोट्या वाटीमध्ये अर्धा चमचा साखर घ्या आणि त्यात अर्धा चमचा मध घाला. आता हे मिश्रण बोटांनी ओठांवर गोल फिरवत लावा. १ ते २ मिनिटं स्क्रब करा. त्यानंतर कोमट पाण्याने ओठ धुवा. वरून लिप बाम लावा. आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा हा स्क्रब वापराल तर ओठांवरील डेड स्किन पूर्णपणे निघून जाईल आणि ओठ अधिक मुलायम व उठावदार दिसतील.
काय काळजी घ्याल?
स्क्रब करताना ओठ जास्त जोरजोरात घासू नका. जर ओठ जास्त फाटलेले असतील तर स्क्रब करण्याआधी थोडं मध लावून थोडा वेळ तसंच ठेवा. ओठ हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्या आणि नियमितपणे लिप बामचा वापर करा.
Web Summary : Sugar and honey exfoliate and moisturize lips, removing dead skin. Gently scrub lips with the mixture 2-3 times a week for soft, vibrant lips. Stay hydrated and use lip balm.
Web Summary : चीनी और शहद होंठों को एक्सफोलिएट और मॉइस्चराइज़ करते हैं, मृत त्वचा को हटाते हैं। मुलायम, जीवंत होंठों के लिए मिश्रण से सप्ताह में 2-3 बार धीरे से स्क्रब करें। हाइड्रेटेड रहें और लिप बाम का प्रयोग करें।