ऑक्टोबर महिना सुरु झाला आणि वातावरणात बदल पाहायला मिळाला. कधी ऊन, कधी पावसामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होत आहे.(potato juice for pigmentation) या बदलामुळे शरीरासोबतच त्वचेवरही परिणाम दिसू लागतो.(dark circles home remedies) या काळात त्वचा कोरडी पडते, चेहऱ्यावर थकवा येतो, अचानक त्वचा टॅन होते.(natural remedies for pigmentation) पिग्मेंटेशन, काळी वर्तुळे अधिक ठळक दिसू लागतात. यामुळे आपल्या त्वचेचा नैसर्गिक ग्लो देखील हरवू लागतो. (how to remove tanning naturally)
त्वचेचा ग्लो टिकवण्यासाठी आपण महागडे सनस्क्रीन, मॉइश्चयराझर लावतो.(potato for dark spots) इतकेच नाही तर महागड्या पार्लरमध्ये जाऊन त्वचेला ग्लो करण्यासाठी पैसे देखील खर्च करतो.(home remedies for glowing skin) पण काही केले तरी त्वचा टॅनच दिसते. त्वचेवरील काळपटपणा हटवण्यासाठी आपण स्वयंपाकघरातील बटाट्याच्या रसाचा वापर करु शकतो.(potato juice face pack) बटाटा किंवा त्याचा रस त्वचेला कशा पद्धतीने लावायला हवा, जाणून घेऊया.
बटाट्याच्या रसात त्वचेला उजळपणा देणारे नैसर्गिक एन्झाइम्स आणि स्टार्च असतात. हे आपल्या त्वचेवरील पिग्मेंटेशन आणि टॅन कमी करण्यास मदत करते. तसेच त्वचेवरील वांग व काळे डाग कमी करतात. ऑक्टोबरसारख्या वातावरणात नैसर्गिक उपाय केल्यास त्वचेचा ओलसरपणा टिकून राहतो. बटाटा किंवा त्याचा रस त्वचेवर कसा लावायचा पाहूया.
सगळ्यात आधी बटाटा सोलून मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यानंतर बारीक करुन पेस्ट बनवा. या पेस्टच्या मदतीने रस काढून घ्या. त्यात तांदळाचे पीठ, चिमूटभर हळद घाला. ही पेस्ट आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर लावा. यामुळे काळे डाग आणि पिग्मेटेंशन कमी होण्यास मदत होईल.
बटाटाचा रस आणि कॉफी पावडर त्वचेसाठी फायदेशीर राहिल. यासाठी दोन्ही घटक पूर्णपणे मिसळा आणि डोळ्यांखाली लावा. २० मिनिटानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. यामुळे काळे वर्तुळे कमी होण्यास मदत होईल.
आपल्याला हवे असल्यास आपण बटाट्याचा रस बर्फाच्या ट्रेमध्ये देखील साठवू शकतो. हा बर्फ आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर घासून घ्या. यामुळे आपल्या त्वचेचे छिद्र खोलवर स्वच्छ होतील. यामुळे त्वचा तरुण आणि चमकदार होईल.
आपण बटाट्याचा रस आणि मुलतानी माती एकत्र करुन देखील त्वचेला लावू शकतो. ज्यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होईल. त्वचेचा रंग उजळेल, डाग कमी होतील आणि त्वचेला नैसर्गिक चमक मिळेल. 
 



