त्वचेची काळजी घेण्यासाठी आपल्याकडे सगळे महागडेच कॉस्मेटिक्स असायला हवेत असं मुळीच नाही. कारण कधी कधी महागड्या कॉस्मेटिक्समुळेही त्वचेवर जे परिणाम दिसत नाहीत ते अगदी आपल्या स्वयंपाक घरात सहजपणे सापडणाऱ्या पदार्थांमुळे दिसून येतात. त्या पदार्थांच्या यादीतला एक पदार्थ म्हणजे मिल्क पावडर. वेगवेगळे पदार्थ करण्यासाठी मिल्क पावडरचा उपयोग केला जातो. त्यामुळे बऱ्याच जणांच्या घरात मिल्क पावडर असतेच (How to Use Milk Powder For Skin Care?). तिचा उपयोग करून पिगमेंटेशन, ॲक्ने, डार्क सर्कल्स यांच्यासारख्या कित्येक समस्या कशा कमी करायच्या ते पाहुया...(use of milk powder for skin care)
त्वचेसाठी मिल्क पावडरचा वापर कसा करायचा?
१. पिगमेंटेशन
हल्ली बऱ्याच जणींना पिगमेंटेशनचा त्रास होत आहे. यालाचा वांग येणे असंही म्हणतात. हा त्रास कमी करायचा असेल तर एका खास पद्धतीने चेहऱ्यावर मिल्क पावडर लावा. त्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीमध्ये १ चमचा मिल्क पावडर आणि १ चमचा ज्येष्ठमध पावडर घ्या. बटाट्याचा रस घालून त्याचा लेप तयार करा. जिथे पिगमेंटेशन असतील तिथे हा लेप लावा आणि २० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. आठवड्यातून एक- दोन वेळा हा उपाय करा.
२. डेड स्किन आणि ब्लॅक हेड्स
१ चमचा साखर, १ चमचा मिल्क पावडर आणि १ चमचा मध एकत्र करून कालवून घ्या. आता चेहरा थोडा ओलसर करा. ओल्या चेहऱ्यावर तयार केलेला लेप लावून १० मिनिटे मसाज करा. त्यानंतर ५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. डेड स्किन, ब्लॅक हेड्स जाऊन चेहरा फ्रेश दिसेल.
१ ग्लास पाण्यात १ चमचा तूप घालून प्यायल्याने काय होतं पाहा- स्वत:मधला बदल पाहून चकित व्हाल
३. ॲक्ने आणि पिंपल्स
ॲक्ने आणि पिंपल्स कमी करण्यासाठीही मिल्क पावडरचा खूप चांगला उपयोग करता येतो. त्यासाठी १ चमचा मिल्क पावडर, १ चमचा नीम पावडर एकत्र करा आणि गुलाबजल घालून लेप तयार करा. ॲक्ने आणि पिंपल्स असलेल्या भागात हा लेप लावा आणि १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका.
४. डार्क सर्कल्स
यासाठी मिल्क पावडर, ॲलोव्हेरा जेल आणि कॉफी पावडर एकत्र करून डोळ्यांच्या भोवती लावा. १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. आठवड्यातून २- ३ वेळा हा उपाय करू शकता.
अधिक मासात आईची ओटी भरून तिला मान देण्याची जुनीच प्रथा! ओटी कशी भरायची- कोणत्या वस्तू घ्यायच्या?
५. टॅनिंग कमी करण्यासाठी
१ चमचा मिल्क पावडरमध्ये चिमूटभर हळद आणि थोडंसं दही किंवा टोमॅटोचा रस घाला. हा लेप चेहऱ्याला लावून मसाज करा. १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. हा उपाय आठवड्यातून ३ ते ४ वेळा करू शकता. टॅनिंग जाऊन त्वचा फ्रेश दिसेल.
Web Summary : Milk powder offers simple skincare solutions. It helps reduce pigmentation, acne, dark circles, and tanning. Mix with ingredients like honey, turmeric, or tomato juice for a fresh, radiant complexion. Cost-effective beauty!
Web Summary : मिल्क पाउडर सरल स्किनकेयर समाधान प्रदान करता है। यह पिगमेंटेशन, मुंहासे, डार्क सर्कल और टैनिंग को कम करने में मदद करता है। ताज़ा, चमकदार रंगत के लिए शहद, हल्दी या टमाटर के रस जैसे तत्वों के साथ मिलाएं। किफायती सौंदर्य!