आयुर्वेदात शुद्ध तूपाला अमृत असं म्हटलं जातं. तुपानं शरीराला बरेच फायदे मिळतात आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यापासून हे हाडांना मजबूत करण्यापर्यंत तूप बरेच फायदेशीर ठरते. पण त्वचेसाठीही तूप तितकेच फायदेशीर ठरते. त्वचेला आतून पोषण देते आणि कोरडेपणा कमी होतो.
ज्यामुळे चेहऱ्याचा नॅच्युरल ग्लो टिकून राहण्यास मदत होते. याशिवाय त्वचा हेल्दी आणि टवटवीत राहते. अनेक उत्पादनांमध्ये तुपाचा वापर केला जातो. तूप हे केवळ अन्नाची चव वाढवण्याासठी नाही तर त्वचेसाठी एक सुपरफूड मानले जाते. आयुर्वेदात तुपाला अमृत मानले असून त्याचे त्वचेसाठी होणारे बरेच फायदे आहेत. (How To Use Ghee On Face)
आयुर्वेदानुसार तूप खाण्याचे फायदे
आयुर्वेदात तूपात थंड, स्निग्ध आणि रसायन मानले जाते. तूप वात आणि कफ संतुलित ठेवण्यासाठी तूप फायदेशीर ठरते. जे त्वचेशी संबंधित आजारांचे मुख्य कारण असते. तूप त्वचेला आतून पोषण देते तसचं घाण कमी करून मृत पेशींना कमी करून त्वचेवर ग्लो आणण्यासही मदत होते. यात एजिंग रोखण्याची क्षमता असते. चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यासाठी तुपाचे सेवन फायदेशीर ठरते.
तूप त्वचेला मऊ बनवते आणि हिवाळ्यात होणाऱ्या कोरडेपणापासूनही वाचवते पण तूपाचे सेवन करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. तुपाचा आहारात समावेश करताना दुपारच्या जेवणात करा. याव्यतिरिक्त रात्रीच्यावेळी तूप चेहऱ्याला लावल्यानं त्वचा मऊ होण्यास मदत होते.
तुपाचा वापर करताना सावधगिरी बाळगायला हवी. योग्य प्रमाणात तुपाचं सेवन करायला हवं. जर तुमची त्वचा खूपच तेलकट असेल तर कमीत कमी याचा वापर करा कारण यामुळे एक्ने उद्भवू शकतात. हृदयाशी संबंधित आजार उद्भवू शकतात. तुपाचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. हृदयाशी संबंधित आजार असल्यास कॉलेस्टेरॉल वाढण्याचा धोका असतो त्यामुळे तुप कमी प्रमाणात खा. अंघोळीपूर्वी १० मिनिटं तुपानं चेहऱ्याला मसाज केल्यास त्वचा मऊ राहते. हे मिश्रण फेस पॅक म्हणून वापरल्यास त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. त्वचेच्या खोलवर स्वच्छतेसाठी याचा वापर करता येतो.
Web Summary : Ayurveda hails ghee as अमृत (amrit). It nourishes skin, reduces dryness, and enhances natural glow. Regular use can minimize wrinkles and keep skin soft. Use in moderation, especially if you have oily skin. Consult a doctor before regular consumption.
Web Summary : आयुर्वेद में घी को अमृत कहा गया है। यह त्वचा को पोषण देता है, रूखापन कम करता है और प्राकृतिक चमक बढ़ाता है। नियमित उपयोग से झुर्रियाँ कम हो सकती हैं और त्वचा मुलायम बनी रहती है। सीमित मात्रा में उपयोग करें, खासकर यदि आपकी त्वचा तैलीय है। नियमित सेवन से पहले डॉक्टर से सलाह लें।