Coconut Oil For Teeth : खोबऱ्याच्या तेलाचा वापर प्रत्येक भारतीय घरांमध्ये केला जातो. वेगवेगळ्या गोष्टींसाठी या तेलाचा वापर केला जातो. खोबऱ्याचं तेल केसांसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. तसेच त्वचेसाठी हे तेल नॅचरल मॉइश्चरायजर ठरतं. अनेक लोक खाण्यासाठीही खोबऱ्याच्या तेलाचा वापर करतात. हे सगळं तर लोकांना माहीत आहेच. पण अनेकांना हे माहीत नसेल की, खोबऱ्याचं तेल तोंडाच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानलं जातं.
खोबऱ्याच्या तेलामध्ये असे अनेक गुण असतात, जे दातांच्या सफाईत मदत करतात. यातील अॅंटी-बॅक्टेरिअल गुण तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतात. खोबऱ्याच्या तेलात खासकरून स्ट्रेप्टोकोकस म्यूटन्स नावंच एक तत्व असतं, जे तोंडातील बॅक्टेरिया मारण्यासाठी प्रभावी ठरतं. हे बॅक्टेरिया दातांना किड लागण्याचं मुख्य कारण असतात.
अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, खोबऱ्याच्या तेलाने दातांवर प्लाक तयार होण्याचं प्रमाण कमी होतं आणि हिरड्यांच्या समस्या दूर करण्यासही मदत मिळते. त्याशिवाय दातांना किडही लागू देत नाही. अशात दातांच्या स्वच्छतेसाठी खोबऱ्याचं तेल कसं वापरावं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
ऑइल पुलिंग
ऑइल पुलिंग करण्यासाठी साधारण २ ते ३ चमचे खोबऱ्याचं तेल तोंडात टाका आणि १५ ते २० मिनिटे हे तेल तोंडात सगळीकडे फिरवा. एकप्रकारे गुरळा करा. यादरम्यान तेल थुंकू नका आणि गिळूही नका. २० मिनिटांनी तेल थुंकू शकता. त्यानंतर टूथपेस्टने ब्रश करा. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करू शकता.
खोबऱ्याच्या तेलामधील अॅंटी-इन्फ्लेमेटरी, अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-मायक्रोबिअल गुण तोंडातील अनेक नुकसानकारक बॅक्टेरिया नष्ट करतात आणि तोंडाचं आरोग्य चांगलं ठेवतात. तसेच खोबऱ्याच्या तेलाने गुरळा केल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होण्यासही मदत मिळते.
खोबऱ्याचं तेल आणि हळद
ऑइल पुलिंगशिवाय दुसरा उपाय म्हणजे खोबऱ्याचं तेल आणि हळद. खोबऱ्याचं तेल आणि अर्धा चमचा हळद घ्या. याची एक पेस्ट तयार करा. ही पेस्ट दातांवर लावा आणि बोटाच्या मदतीने दातांवर घासा. काही वेळाने साधा पाण्याने गुरळा करा. या उपायाने पिवळे दात चमकदार होतील. तसेच श्वासाची दुर्गंधीही दूर होईल.
खोबऱ्याच्या तेलाप्रमाणेच हळदीमध्येही अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि अॅंटी-सेप्टिक गुण असतात. याने हिरड्यांची सूज कमी होते. दातांची किडही दूर होण्यास मदत मिळते. तसेच दात चमकदारही होतील.