Join us

केस पांढरे झाले आणि कोंडाही वाढलाय? काळी मिरीची पूड अत्यंत फायदेशीर, पाहा खास उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 14:20 IST

Black Hair Home Remedies : जर तुमचे केस पांढरे झाले असतील किंवा गळत असतील तर तुम्हाला काळी मिरीची पूड फायदेशीर ठरू शकते. ती कशी याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.      

Black Hair Home Remedies : तुम्ही अनेकदा काळी मिरीचे आरोग्याला होणारे फायदे याबाबत ऐकलं किंवा वाचलं असेल. यानं जेवणाची टेस्ट तर वाढतेच सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. फक्त आरोग्यच नाही तर केस आणि त्वचेसाठी सुद्धा काळी मिरीची पूड फायदेशीर ठरते. ज्याबाबत अनेकांना माहीत नसतं. जर तुमचे केस पांढरे झाले असतील किंवा गळत असतील तर तुम्हाला काळी मिरीची पूड फायदेशीर ठरू शकते. ती कशी याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.                   

चमकदार केसांसाठी फायदेशीर 

काळी मिरीच्या पूडनं केस चमकदार तर होतातच सोबतच केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्याही दूर होतात. फक्त याचा वापर काळजीपूर्वक करणं महत्वाचं ठरतं. 

केसांमधील कोंडा होईल दूर

काळ्या मिरीमध्ये व्हिटामिन सी असतं, जे डोक्याची त्वचा स्वच्छ ठेवतं आणि यानं डॅंड्रफपासून सुटका मिळते. यासाठी तुम्हाला व्हर्जिन ऑइलमध्ये चिमुटभर काळी मिरी पूड टाकावी लागेल. ही पेस्ट केसांना लावा. काही तास ही पेस्ट केसांना तशीच लावून ठेवा. नंतर नॉर्मल पाण्यानं केस धुवावे.

डोक्याची त्वचा करा स्वच्छ

केवळ एक चमचा काळ्या मिरीच्या पूडमध्ये दोन चमचे लिंबाचा रस मिश्रित करा. यानं डोक्याची त्वचा स्वच्छ होण्यासोबतच केस मुलायम होतील. हे मिश्रण केसांवर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर केस कोमट पाण्याने धुवावे.

पांढरे केस काळे होतील

एक चमचा काळी मिरी पूड आणि त्यात तीन चमचे दही मिश्रित करा. हे मिश्रण केसांवर २० मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर केस पाण्यानं धुवावे. काळ्या मिरींमध्ये कॉपरचं प्रमाण अधिक असतं, याने केस पांढरे होत नाहीत. तसेच दह्याने केस मॉइश्चराइज होतात.

केसांची वाढ होते

काळ्या मिरीमुळे हेअर फॉलिकल्स स्टीम्यूलेट होतात, सोबतच याने टक्कल पडण्याची समस्या कमी होऊ शकते. यासाठी तुम्हाला काळ्या मिऱ्यांमध्ये ऑलिव्ह ऑइल मिश्रित करावं लागेल. हे मिश्रण एका डब्यात दोन दिवसांसाठी बंद करून ठेवा. नंतर हे तेल केसांना लावा. ३० मिनिटांनंतर केस थंड पाण्यानं धुवावे.

टॅग्स :केसांची काळजीत्वचेची काळजीब्यूटी टिप्स