Join us  

महागडे डी-टॅन कशाला? बेसनात मिसळा २ गोष्टी; चेहरा होईल क्लिन-दिसेल नैसर्गिक चमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2024 4:07 PM

How to use besan for skin whitening and removing Tan : बेसन लावल्यानेही टॅनिंग दूर होते, फक्त त्याचा वापर कसा कराल? पाहा..

उन्हाळा सुरु होताच आरोग्यासह चेहरा आणि केसांच्या निगडीत समस्या वाढतात (Beauty Tips). चेहरा डल आणि तेज कमी होते. शिवाय टॅनिंग, मुरुमांचे डाग, काळपट डाग, पिग्मेण्टेशन, यासह इतर कारणांमुळे चेहऱ्यावरचा ग्लो काहीसा कमी होतो (Tanning Removal). उन्हाळ्यात चेहरा कायम तुकतुकीत आणि फ्रेश दिसावे म्हणून आपण ब्यूटी पार्लरच्या चकरा मारतो.

पण ब्यूटी पार्लरमध्ये खर्च करण्यापेक्षा आपण घरातच टॅनिंग रिमुव्हल क्रीम तयार करून चेहरा क्लिन करू शकता (Skin Care Tips). ब्यूटी पार्लरमध्ये बऱ्याचदा रासायनिक गोष्टींचा वापर करून चेहरा क्लिन जातो. पण महागडे आणि रसायनयुक्त गोष्टींचा वापर न करता, आपण बेसनचा वापर करूनही चेहरा डी-टॅन करू शकता. या नैसर्गिक क्रीममुळे चेहरा टवटवीत दिसेल यात काही शंका नाही(How to use besan for skin whitening and removing Tan).

घरातच करा चेहऱ्याला डी-टॅन

लागणरं साहित्य

बेसन 

गुलाब जल 

हळद 

अशा पद्धतीने तयार करा डी-टॅन क्रीम

केसांना तेल-मास्क लावूनही वाढ होत नाही? आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश; मुळे आतून मजबूत होतील

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये २ चमचे बेसन घ्या. त्यात अर्धा चमच हळद आणि ३ चमचे गुलाब पाणी घालून मिक्स करा. तयार पेस्ट व्यवस्थित मिक्स केल्यानंतर काही वेळासाठी तसेच ठेवा, आणि मग याचा वापर थेट चेहऱ्यावर करा.

चेहऱ्यावर डी-टॅन क्रीम कसे लावावे?

सर्वात आधी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. नंतर पुसून घ्या. तयार क्रीम बोटाने किंवा ब्रशने स्किनवर लावा. काही वेळासाठी चेहऱ्यावर क्रीम तशीच ठेवा. सुकल्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. आपण या डी-टॅन क्रीमचा वापर आठवड्यातून २ ते ३ वेळा करू शकता. यामुळे चेहऱ्यावरचे डाग, टॅनिंग यासगळ्या समस्या दूर होतील.

चेहऱ्यावर बेसन लावण्याचे फायदे

बेसन फक्त स्वयंपाकासाठी वापरात येत नसून, याचा वापर आपण स्किनसाठीही करू शकता. खरंतर बेसन मुरुमांच्या डागांवर सर्वात प्रभावी ठरते. शिवाय टॅनिंग देखील दूर करते. त्वचेला एक्सफोलिएट करते, घाण, प्रदूषण आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करते.

ब्लॅकहेड्समुळे चेहऱ्याची शोभा कमी झाली? चमचाभर टूथपेस्टमध्ये मिसळा २ गोष्टी, चेहरा होईल क्लिन..

हळद

हळदीच्या वापराने चेहऱ्याचे अनेक समस्या दूर होतात. हळदीच्या वापरामुळे त्वचा चांगल्या पद्धतीने एक्सफोलिएट होते. त्यात अँटीऑक्सिडेंट, अँटीफंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे त्वचेची ऍलर्जी, फोड आणि मुरुमांपासून मुक्त करण्यास मदत करते. शिवाय टॅनिंग देखील दूर होते. ज्यामुळे स्किन तुकतुकीत कायम फ्रेश दिसते.

गुलाब पाणी

मुरुमांचे डाग, काळे डाग, टॅनिंग, मृत त्वचा यासह इतर त्वचेच्या समस्या सोडवण्यासाठी आपण गुलाब पाण्याचा वापर करू शकता. अँटी-ऑक्सिडंट्सनी समृद्ध गुलाब पाणी सौंदर्य खुलविण्यासाठी मदत करते. जर आपण दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर संपूर्ण चेहऱ्याला गुलाब पाणी लावले तर, त्वचा अधिक सुंदर दिसते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी