सध्याच्या धावपळीच्या जगात प्रदूषित हवा आणि केमिकल्सयुक्त उत्पादनांमुळे आपल्या त्वचेसह केसांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. सकाळी उठल्यावर आरशात पाहिले की चेहरा निस्तेज दिसतो.(home remedies for glowing skin) कंगव्यात अडकलेले केसांचे पुंजके पाहून आपल्याला काळजी वाटते. महागड्या पार्लर ट्रीटमेंट किंवा ब्रँड्सच्या मागे धावण्यापेक्षा, आपल्या स्वयंपाकघरातच सौंदर्याचा एक मोठा खजिना दडलेला आहे. तो म्हणजे 'आले'.(hair growth home remedy)
खरं सौंदर्य हे बाहेरुन लावणाऱ्या गोष्टींपेक्षा आपल्या शरीराच्या आत काय जातं, यावर अवलंबून असतं.(ginger juice benefits) आपल्या स्वयंपाकघरातील अशा ४ जादुई गोष्टी, ज्यांचा एकत्र ज्यूस करुन प्यायल्यास केवळ ७ दिवसांत आपला चेहरा पुन्हा उजळण्यास मदत होईल आणि केस मुळांपासून मजबूत होतील.(natural beauty tips) हा उपाय इतका स्वस्त आणि प्रभावी आहे की तुम्ही महागड्या ट्रिटमेंट्स विसरून जाल.
हाय बीपी आणि शुगर वाढण्याची भीती विसरा! नाश्त्याला खा पौष्टिक बाजरीचा डोसा, पाहा झटपट रेसिपी
आल्याचा रस, बीट, आवळा आणि कढीपत्ता या चारही गोष्टी एकत्र करुन तयार केलेला हा साधा उपाय चांगला आहे. नियमित सेवन केल्याने शरीर आतून स्वच्छ होऊन त्याचा परिणाम थेट चेहऱ्यावर आणि केसांवर दिसून येतो. हे ड्रिंक बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी बीट, आवळा आणि आले सोलून धुवून घ्यावे लागेल. नंतर मिक्सरच्या भांड्यात या सर्व घटकांचे छोटे तुकडे करा आणि ते मिश्रणात घाला. नंतर त्यात थोडे पाणी घाला आणि बारीक करा. रस तयार होईल.
हा रस अधिक काळ साठवण्यासाठी आपण याचे आइस क्यूब तयार करु शकतो. आपल्याला हा रस रोज बनवण्याची गरज नाही. कोमट पाण्यात दोन बर्फाचे तुकडे विरघळवून रोज रिकाम्या पोटी प्या. यामुळे आपली त्वचा आणि केस दोघांनाही फायदा होईल. हा ज्यूस रोज प्यायल्याने आपली पचनक्रिया सुधारते, थकवा कमी होतो आणि त्वचा अधिक स्वच्छ व तजेलदार दिसू लागते. केसांना पोषण मिळाल्याने केस गळण्याचं प्रमाणही हळूहळू कमी होतं आणि केस अधिक मजबूत होतात. तसेच सात दिवसांच्या आतच हलका फरक जाणवू लागतो, तर काही आठवड्यांत परिणाम अधिक स्पष्ट दिसतात.
