Amla and Aloevera to stop hairfall : वाढत चाललेल्या केसगळतीमुळे भरपूर लोक चिंतेत आहेत. कारण यामुळे कमी वयातच टक्कल पडतं, केस विरळ होतात. महिलाच काय तर पुरूषही या समस्येने हैराण आहेत. घरात सकाळी केस विंचरल्यानंतर केसांचा सडा पडलेला दिसतो. तो अधिक चिंता वाढवणारा असतो. आपल्याला सुद्धा हा त्रास असेल आणि अनेक उपाय करूनही फायदा मिळाला नसेल तर आम्ही आपल्यासाठी एक खास उपाय आणला आहे. आवळा आणि कोरफड या दोन नॅचरल गोष्टी मिक्स करून केसांवर लावल्यास केसगळती दूर होऊ शकते. अशात याचा वापर कसा करावा आणि याचे फायदे पाहुयात.
आवळ्याचे केसांसाठी फायदे
आवळ्यामध्ये व्हिटामिन सी भरपूर असतं. आवळा आपल्या त्वचेला चमकदार बनवण्यास आणि डाग-चट्टे हलके करण्यास मदत करतो, तसेच केसांसाठीही फायदेशीर ठरतो. आवळ्यातील व्हिटामिन सी, खनिजे आणि अॅंटी-ऑक्सिडंट्स डोक्याची त्वचा स्वच्छ ठेवतात, ब्लड सर्कुलेशन सुधारतात आणि केसांच्या मुळांना पोषण देतात. त्यामुळे केस अधिक मजबूत होतात आणि गळती कमी होते.
कोरफडीच्या गराचे फायदे
कोरफडीच्या गरानं डोक्याची त्वचा हायड्रेट राहते, कोरडेपणा आणि कोंडा कमीही होतो. तसेच खाज सुटण्याची समस्या दूर होते. यामुळे केस मऊ, चमकदार आणि मजबूत बनतात. याशिवाय कोरफडीचा गर केसांवर एक नॅचरल प्रोटेक्शन लेयर तयार करतो, ज्यामुळे केस डॅमेजपासून वाचतात.
हेअर पॅक कसा बनवायचा?
साहित्य
2 चमचे आवळा पावडर
2 चमचे कोरफडीचा गर
2 चमचे खोबऱ्याचं तेल किंवा तिळाचे तेल
सर्व गोष्टी एका बाउलमध्ये घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत लावा. 30–45 मिनिटे तसेच ठेवा आणि नंतर माइल्ड शाम्पूनं केस धुवा. आठवड्यातून एक किंवा दोनदा हा पॅक वापरल्यास केस गळणे कमी होते.
आवळा आणि कोरफडीचं तेल
हे तेल केसांच्या मुळांपर्यंत पोहोचून अधिक खोलवर पोषण देतं. हे तेल तयार करण्यासाठी लागणारे साहित्य –
1 कप खोबऱ्याचं तेल
2 चमचे आवळा पावडर
2 चमचे कोरफडीचा गर
2 चमचे मेथीदाणे
आता एका पॅनमध्ये सर्व साहित्य घालून मंद आचेवर 5 मिनिटे शिजवा. नंतर गॅस बंद करून तेल गाळून बाटलीत काढा. हे तेल रोज डोक्याच्या त्वचेवर आणि केसांच्या टोकांवर लावल्यास काही दिवसांतच केस गळणे कमी होते आणि केस दाट, मजबूत बनतात.
