Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > घामाची दुर्गंधी-त्वचेच्या समस्या दूर करणारा फक्त १० रुपयांचा सोपा उपाय, स्वयंपाकघरातली सहज जादू

घामाची दुर्गंधी-त्वचेच्या समस्या दूर करणारा फक्त १० रुपयांचा सोपा उपाय, स्वयंपाकघरातली सहज जादू

Alum use for Skin : केवळ १० रूपयांची तुरटी आणल्यास त्वचेसंबंधी कितीतरी समस्या लगेच दूर होतील. यासाठी तुरटीचा वापर कसा करावा हे आपण जाणून घेणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 16:12 IST2026-01-20T11:47:43+5:302026-01-20T16:12:05+5:30

Alum use for Skin : केवळ १० रूपयांची तुरटी आणल्यास त्वचेसंबंधी कितीतरी समस्या लगेच दूर होतील. यासाठी तुरटीचा वापर कसा करावा हे आपण जाणून घेणार आहोत.

How to use alum to get rid off smelly feet to pigmentation | घामाची दुर्गंधी-त्वचेच्या समस्या दूर करणारा फक्त १० रुपयांचा सोपा उपाय, स्वयंपाकघरातली सहज जादू

घामाची दुर्गंधी-त्वचेच्या समस्या दूर करणारा फक्त १० रुपयांचा सोपा उपाय, स्वयंपाकघरातली सहज जादू

Alum use for Skin :  आपल्याला रोज लाइफस्टाईलसंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. मग ती घामाची दुर्गंधी असेल, पायांची दुर्गंधी असेल, चेहऱ्यावरील मुरूम किंवा डाग असतील अशा कितीतरी गोष्टी सतत डोकं वर काढत असतात. अशात या समस्या दूर करण्यासाठी नेमकं काय करावं? असा प्रश्न आपल्याला पडतोच. बरेच लोक महागडे क्रीम, परफ्यूम वेगवेगळ्या प्रॉडक्ट्ससाठी भरपूर पैसेही खर्च करतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, या रोजच्या समस्या दूर करण्यासाठी जास्त पैसे खर्च करण्याची आणि मेहनत घेण्याचीही गरज नाही. कारण एक असा उपाय आहे जो आपल्या रोजच्या कितीतरी समस्या झटक्यात सोडवू शकतो. हा उपाय म्हणजे तुरटी. दुकानातून केवळ १० रूपयांची तुरटी आणल्यास कितीतरी समस्या लगेच दूर होतील. यासाठी तुरटीचा वापर कसा करावा हे आपण जाणून घेणार आहोत. सोबतच तुरटीचे फायदेही पाहुयात.

काखेतील दुर्गंधी

रोजची धावपळ, घरातील कामे करता करता शरीरावर चांगलाच घाम येतो. खासकरून काखेत खूप घाम येतो आणि ज्यामुळे काखेतून दुर्गंधी येते. अशात घामाची दुर्गंधी घालवण्यासाठी आपण तुरटीचा वापर डिओड्रंट स्टिकसारखाही करू शकता. यासाठी तुरटीचा तुकडा पाण्यात भिजवा आणि काखेत ३ ते ४ वेळा फिरवा. त्यानंतर काखा पाण्याने स्वच्छ करा आणि नंतर मॉइश्चरायजर लावा. असं केल्याने दुर्गंधी पसरवणारे बॅक्टेरिया नष्ट होतील.

पायांची दुर्गंधी घालवा

दिवसभर पायांमध्ये शूज घालून राहत असाल तर नक्कीच पायांची दुर्गंधी येईल. पायांची दुर्गंधी घालवायची असेल तर एका टबमध्ये पाणी घ्या आणि त्यात थोडी तुरटीची पावडर मिक्स करा. या पाण्यात थोडावेळ पाय बुडवून बसा. हा उपाय केल्यास पायांची दुर्गंधी लगेच दूर होईल. तुरटीमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात, जे दु्र्गंधी वाढवणारे बॅक्टेरिया नष्ट करतात.

पुरळ-फोड होतील दूर

तुरटीच्या मदतीने आपण चेहऱ्या नेहमीच येणारी पुरळ किंवा फोड कमी करू शकता. बाजारातील महागड्या क्रीमपेक्षा हा उपाय अधिक फायदेशीर ठरू शकतो. यासाठी एका पॅनमध्ये पाणी गरम करा. यहे पाणी थंड झाल्यावर त्यात थोडी तुरटीची पावडर घाला. नंतर हे पाणी पुरळ असलेल्या भागांवर लावा. काही वेळाने चेहरा साध्या पाण्याने धुवा आणि मॉइश्चरायजर लावा.

पिगमेंटेशन कमी होईल

तुरटीची मदत आपण चेहऱ्यावरील काळपटपणा कमी करण्यासाठी देखील करू शकता. यासाठी तुरटीची पावडर घ्या, त्यात थोडी कच्ची हळद आणि गुलाबजल मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानंतर चेहरा धुवून घ्या आणि चेहऱ्यावर मॉइश्चरायजर लावा. हा उपाय आपण आठवड्यातून दोन ते तीनवेळा करू शकता.

पॅच टेस्ट करा

तुरटीचे अनेक फायदे असले तरी सगळ्या प्रकारच्या त्वचेला हे फायदे मिळत नाहीत. काही लोकांना यापासून अॅलर्जी होऊ शकते. अशात तुरटीचा वापर करण्याआधी पॅच टेस्ट करणं गरजेचं असतं. जर काही समस्या होत नसेल, खाज येत नसेल तरच तुरटीचा वापर करा. जर त्वचेवर काहीच काही समस्या असेल किंवा आपली त्वचा खूप ड्राय असेल तर तुरटी वापरू नका. याने त्वचा आणखी ड्राय होऊ शकते.

Web Title : फिटकरी: पसीने की दुर्गंध और त्वचा की समस्याओं के लिए 10 रुपये का उपाय

Web Summary : फिटकरी शरीर की दुर्गंध, पैरों की दुर्गंध, मुंहासे और पिगमेंटेशन के लिए एक किफायती समाधान है। इसे डिओडोरेंट, फुट सोक या फेस मास्क के रूप में इस्तेमाल करें। उपयोग से पहले पैच टेस्ट की सलाह दी जाती है।

Web Title : Alum: A 10-Rupee Solution for Sweat Odor and Skin Problems

Web Summary : Alum offers a budget-friendly fix for body odor, foot odor, acne, and pigmentation. Use it as a deodorant, foot soak, or face mask. Patch test recommended before use.