Alum And Coconut Oil Benefits : त्वचा असो वा केस वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी तुरटी अनेक दृष्टीने फायदेशीर ठरते. इतकंच नाही तर आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यासही तुरटी फायदेशीर असते. खासकरून खोबऱ्याचं तेल आणि तुरटी मिक्स करून लावल्यास त्वचेसंबंधी अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते. यात अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. जर तुम्ही नियमितपणे तुरटी आणि खोबऱ्याच्या तेलाचा वापर करत असाल तर अनेक समस्या दूर होतात. अशात या दोन्ही गोष्टींचा वापर करून कोणत्या समस्या दूर होतात आणि वापर कसा करावा हे जाणून घेऊ.
डेड स्कीन
चेहऱ्यावरील डेड स्कीन दूर करण्यासाठी तुम्ही खोबऱ्याचं तेल आणि तुरटीचा वापर करू शकता. याने त्वचेवर चिकटून असलेली धूळ-मळही दूर होतो. सोबतच त्वचेची रोमछिद्रेही मोकळी होतात. अशात चेहरा आणखी खुलून दिसतो.
चेहऱ्यावर येईल ग्लो
तुरटी आणि खोबऱ्याच्या तेलाचं मिश्रण चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी फायदेशीर ठरतं. जेव्हा तुम्ही या मिश्रणाने चेहऱ्यावर मसाज करत असाल, तर याने त्वचा खोलवर मॉइश्चराईज होते. तसेच त्वचेमध्ये ब्लड सर्कुलेशनही चांगलं होतं, ज्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो.
जखम लवकर भरते
कोणत्याही प्रकारची जखम किंवा घावावर तुरटी व खोबऱ्याचं तेल लावलं तर घाव लवकर भरतो. तुरटी आणि खोबऱ्याच्या तेलात अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटी-फंगल गुण असतात. ज्यामुळे घाव लवकर भरण्यास मदत मिळते. सोबतच याने जखम वाढतही नाही.
केसांसाठी फायदेशीर
केस पांढरे होत नाही
तुरटी आणि खोबऱ्याच्या तेलाच्या मिश्रणाने केस पांढरे होण्याची समस्याही दूर केली जाऊ शकते. जेव्हा या तेलाने तुम्ही मसाज करता तेव्हा याने डोक्याच्या त्वचेमध्ये ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. अशात तुमच्या केसांना भरपूर पोषण मिळतं, ज्यामुळे केस पांढरे होत नाहीत.
केसगळतीही थांबेल
हिवाळ्यात बऱ्याच लोकांचे केस गळतात. अशात ज्यांचे केस गळतात त्यांच्यासाठी खोबऱ्याचं तेल आणि तुरटीचं मिश्रण फायदेशीर ठरतं. याने डोक्याच्या त्वचेमध्ये होणारं इन्फेक्शन आणि बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत मिळते. अशात आठवड्यातून दोन ते तीन वेळा या तेलाच्या मिश्रणाने मालिश करण्याचा सल्ला एक्सपर्ट देतात. खोबऱ्याचं तेल आणि तुरटीच्या तेलाने डोक्याच्या त्वचेची मालिश केल्यास ब्लड सर्कुलेशनही चांगलं होतं. ज्यामुळे केसगळती थांबते.
कसं वापराल यांचं मिश्रण?
एका वाटीमध्ये थोडं खोबऱ्याचं तेल घ्या आणि ते गॅसवर गरम करा. यात तुरटी बारीक करून टाका. ती तेलात चांगली मिक्स करा. कोमट असताना हे मिश्रण डोक्याच्या त्वचेवर लावा. हलक्या हाताने मसाज करा. अर्धा तास तसंच ठेवा नंतर केस धुवून घ्या. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय कराल तर तुम्हाला खूप दिसून येईल.