Almond For Skin : सगळ्यांनाच असं वाटत असतं की, आपला चेहरा फ्रेश आणि ग्लोईंग दिसावा. यासाठी सगळेच वेगवेगळे उपाय करत असतात. आता तर लग्न-समारंभाना सुरुवात होणार आहे त्यामुळे अशात चेहऱ्याची अधिक काळजी घ्यावी लागते. पार्लरमध्ये जाऊन चेहऱ्यावर मेकअप तर केला जाऊ शकतो. पण नैसर्गिक चमक मिळवण्यासाठी घरीच काही खास उपाय कामात येतात. बदाम आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. तसंच ते त्वचेसाठीही फायदेशीर ठरतं. ते कसं हे जाणून घेऊ.
ग्लोईंग त्वचेसाठी बदाम
बदाम त्वचेसाठी किती फायदेशीर आहे हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. पण बदामाचा उपयोग कसा करावा हे फार महत्त्वाचं आहे. जर तुम्ही बदामाच्या फेस पॅकचा वापर केला असेल तर याचे फायदे तुम्हाला माहीत असतीलच. पण काय तुम्हाला बदामाचे फेस पॅक कसे तयार करायचे हे माहीत आहे? जर नसेल तर आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत.
बदामाचा कसा कराल वापर?
१) एक चमचा बदामाचं पावडर आणि दोन चमचे कच्च दूध मिश्रित करुन चेहऱ्यावर लावा. १० ते १५ मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ करा. याने चेहरा स्वच्छ होऊन लगेच चेहरा ग्लो करायला लागेल.
२) बदाम बारीक करुन त्यात लिंबाचा रस टाका. आता ही पेस्ट डोळ्यांचा भाग सोडून पूर्ण चेहऱ्यावर लावा आणि मानेवर लावा. काही वेळाने चेहरा पाण्याने धुवा. त्यानंतर लोशन लावायला विसरु नका.
३) १ चमचा मुलतानी माती, काही थेंब गुलाबजल आणि २ चमचे बदाम पावडर मिश्रित करा. हे १० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर चेहरा धुवून घ्या. ऑयली स्किनसाठी हा फेस पॅक फायदेशीर आहे.
४) ४ ते ५ बदाम बारीक करुन त्यात मध मिक्स करा. हा पॅक १० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. लगेच चमकदार चेहरा हवा असेल तर हा पॅक फार फायदेशीर आहे.
५) बारीक केलेल्या बदामामध्ये नारळाचं दूध मिश्रित करुन चेहऱ्यावर लावा आणि चेहरा कोरडा झाल्यावर पाण्याने धुवून घ्या. हा फेस पॅक तुमचा स्किन टोन हलका करण्यास मदत करतो. सोबतच याने तुम्हाला चमकदार त्वचाही मिळते.
६) बदाम भिजवून ठेवा आणि त्यानंतर बारीक करा. आता यात पपईचा गर मिश्रित करा आणि चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनी चेहरा धुवून घ्या. याने चमकदार त्वचा मिळेल आणि पिंपल्स, काळे डाग आणि ब्लॅकहेड्स दूर होतात.