केसांच्या एक ना अनेक समस्या आजकाल आपल्यापैकी अनेकांना त्रास देतात. केसांच्या अनेक समस्यांपैकी केस अकाली किंवा फारच कमी वयात पांढरे होण्याची समस्या फार कॉमन आहे. आपले केस काळेभोर असावेत अशी प्रत्येकीचीच इच्छा असते परंतु अचानकपणे केस पांढरे होऊ लागल्यावर आपला लूक बिघडतो. केस एकदा का पांढरे झाले की ते लपवण्यासाठी मेहेंदी, हेअर कलर किंवा डाय लावणं ओघाने आलंच...(how to turn white hair black naturally).
पांढरे केस लपवण्यासाठी बहुतांश लोक मेहेंदी किंवा केमिकल डायचा फार मोठ्या प्रमाणावर वापर करतात. मात्र हे उपाय तात्पुरते असतात आणि अनेकदा केसांना कोरडेपणा, तुटणे किंवा गळतीसारख्या समस्या निर्माण करतात. त्यामुळे केसांचे नैसर्गिक आरोग्य जपण्यासाठी केमिकलपासून दूर राहणारे, सुरक्षित आणि घरगुती उपाय शोधणं गरजेचं आहे. खरंतर, आपल्या स्वयंपाकघरातच असे अनेक नैसर्गिक पदार्थ उपलब्ध आहेत, जे दररोज वापरल्यास केसांचा रंग टिकवण्यास, पांढरे केस उशिरा (natural remedies for white hair) येण्यास आणि केस मजबूत व चमकदार करण्यास मदत करतात. जे कोणत्याही दुष्परिणामाशिवाय पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करण्यास मदत करतात. हे उपाय केवळ केसांचा रंगच सुधारत नाहीत, तर मुळांपासून केसांना पोषण देऊन (white hair treatment without dye & mehendi) ते मजबूत आणि चमकदार करतात. मेहेंदी किंवा डाय लावण्यापेक्षा पांढरे केस काळे करण्याचे घरगुती व नैसर्गिक उपाय नेमके कोणते ते पाहूयात...
पांढरे केस काळे करण्यासाठी मेहेंदी - डाय नकोच...
१. आवळा आणि शिकेकाई (Amla and Shikakai) :- पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी आवळा आणि शिकेकाई यांचे मिश्रण अत्यंत फायदेशीर मानले जाते. आवळा आणि शिकेकाई यांना केसांच्या पोषणाचा 'खजिना' म्हटले जाते, कारण त्यात व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. एका बाऊलमध्ये आवळा आणि शिकेकाई पावडर समप्रमाणत घ्या. त्यात थोडे पाणी मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत नीट लावा. साधारण ३० ते ४५ मिनिटे तशीच राहू द्या आणि त्यानंतर सौम्य शाम्पूने केस धुवा. हा उपाय नियमित केल्यास केस नैसर्गिकरित्या काळे होण्यास मदत होते.
२. काळा चहा (Black Tea) :- चहाची पावडर आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात कायम असतेच. चहा पावडरचा वापर फक्त चवीसाठीच नाही, तर पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. एक कप पाण्यात ३ ते ४ चमचे चहाची पावडर टाकून ते पाणी चांगले उकळून घ्या. हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या. त्यानंतर या पाण्याने आपले केस स्वच्छ धुवा. या उपायामुळे केस केवळ काळेच होत नाहीत, तर त्यांना एक नैसर्गिक चमकही मिळते.
३. खोबरेल तेल आणि लिंबाचा रस (Coconut Oil and Lemon Juice) :- खोबरेल तेल त्वचा आणि केसांसाठी अत्यंत गुणकारी मानली जाते. जर आपल्याला पांढऱ्या केसांच्या समस्येपासून सुटका हवी असेल, तर खोबरेल तेल आणि लिंबाच्या रसाचा वापर करणे हा एक उत्तम पर्याय आहे. खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळून त्याने केसांच्या मुळांशी हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यानंतर काही तास हे तेल केसांवर तसेच राहू द्या आणि त्यानंतर केस स्वच्छ धुवा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून २ वेळा करू शकता.
मंगळसुत्रावर नाचरा मोर, पाहा मोर मंगळसुत्राच्या सुंदर डिझाइन्स-गळ्यात दिसेल शोभून सुंदर अलंकर...
४. कडीपत्ता आणि खोबरेल तेल (Curry Leaves and Coconut Oil) :- पांढऱ्या केसांची समस्या मुळापासून सोडवण्यासाठी कडीपत्ता अत्यंत फायदेशीर आहे. कडीपत्त्यामुळे केसांमधील मेलेनिन टिकून राहण्यास मदत होते. खोबरेल तेलात मूठभर कडीपत्ता घालून तेल चांगले उकळून घ्या. पाने काळी पडल्यानंतर तेल थंड करा आणि गाळून घ्या. या तेलाने आठवड्यातून दोनदा केसांच्या मुळांशी मसाज करा.
