लेहेंगा घातल्यावर कंबर,पोट जाडजूड दिसतंय? ७ ट्रिक्स - पोट कणभरही दिसणार नाही आणि लूक दिसेल लाखात एक...
Updated:February 5, 2026 21:40 IST2026-02-05T21:40:00+5:302026-02-05T21:40:01+5:30
7 smart fashion hacks to hide belly fat in lehenga : hide belly fat in lehenga : fashion hacks to hide belly fat in lehenga : lehenga styling tips for belly fat : आता लेहेंग्यात पोट दिसण्याची चिंता सोडा! सेलिब्रिटी स्टायलिस्टच्या ७ ट्रिक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक...

लग्नकार्य, सणवार असो किंवा घरगुती खास कार्यक्रम, लेहेंगा घातल्यावर (7 smart fashion hacks to hide belly fat in lehenga) मिळणाऱ्या 'रॉयल लूकला' कशाचीही सर नसतेच. पण अनेकदा महागडा आणि सुंदर लेहेंगा घातल्यावर एक समस्या अनेकजणींना सतावते, ती म्हणजे पोट दिसणे किंवा कंबरेचा भाग जाड दिसणे. यामुळेच बऱ्याचजणींना लेहेंगा घालताना अवघडल्यासारख होत किंवा त्यांचा आत्मविश्वास कमी होतो.
अनेकदा लेहेंगा घातल्यानंतर पोटाचा भाग उठून दिसतो, कंबरेजवळील भाग (lehenga styling tips for belly fat) जाडजूड वाटतो आणि त्यामुळे संपूर्ण लूक बिघडल्यासारखा वाटतो. अशा परिस्थितीत, महागडा लेहेंगा असूनही आत्मविश्वास कमी होतो
पण काळजी करू नका! योग्य फिटिंग, स्टायलिंग आणि काही स्मार्ट फॅशन ट्रिक्स वापरल्या, तर लेहेंग्यात पोट अजिबात दिसणार नाही आणि आपण अधिक स्लीम, ग्रेसफुल लूक सहज मिळवू शकता. लेहेंगा कोणताही असो, तो घालण्याची पद्धत आणि काही छोट्या स्टाईलिंग ट्रिक्स वापरून आपण वाढलेले पोट सहज लपवू शकतो आणि स्लिम दिसू शकतो.
१. दुपट्टा ड्रेपिंग ट्रिक्स :-
दुपट्टा एका खांद्यावर पिन करा आणि समोरच्या बाजूने तो सरळ खाली सोडू द्या. यामुळे पोटाचा अर्धा भाग झाकला जातो आणि आपली उंचीही जास्त असल्याचा आभास निर्माण होतो. दुसऱ्या पद्धतीमध्ये, दुपट्टा एका खांद्यावर पिन करून त्याचा दुसरा टोक तिरकस घेऊन कंबरेच्या दुसऱ्या बाजूला खोचा किंवा पिन करा. यामुळे एक 'इल्यूजन' तयार होते, ज्यामुळे कंबर पातळ आणि सुबक दिसते. दुपट्टा खांद्यावर घेऊन तो व्यवस्थित सेट करा आणि त्यावर एक डिझायनर बेल्ट लावा. यामुळे दुपट्टा जागेवर स्थिर राहतो आणि पोटाचा भाग पूर्णपणे कव्हर होतो.
२. शेपवेअर ,पेटीकोट किंवा टमी टकर वापरा :-
लेहेंग्यासाठी खास मिळणारे शेपवेअर पेटीकोट किंवा टमी-टकर पोटाचा भाग इन शेप ठेवतात आणि लेहेंग्याला सुंदर फ्लो देतात.
३. हाय-वेस्ट लेहेंगा निवडा :-
लो-वेस्ट लेहेंग्यांमुळे पोटाचा भाग जास्त उठून दिसतो. याऐवजी हाय-वेस्ट लेहेंगा घातल्यास कंबर नीट कव्हर होते आणि पोट आपोआप कमी दिसते. लेहेंगा नेहमी बेंबीच्या थोडे वर म्हणजेच कंबरेच्या सर्वात अरुंद भागावर बांधा. यामुळे पोटाचा घेर लेहेंग्याच्या आत झाकला जातो आणि तुमची उंचीही जास्त दिसते.
४. गडद रंगांची निवड करावी :-
जर तुम्हाला पोट आणि कंबरेचा भाग कमी दाखवायचा असेल, तर नेहमी गडद रंगांचा लेहेंगा निवडा. डार्क मरून, रॉयल ब्लू, बॉटल ग्रीन, वाईन किंवा काळा यांसारखे रंग प्रकाश शोषून घेतात, ज्यामुळे शरीराचा जाडसर भाग ठळकपणे उठून दिसत नाही. याउलट, फिकट किंवा पेस्टल रंग प्रकाशाचे परावर्तन करतात, ज्यामुळे शरीराचे कर्व्स आणि पोटाचा भाग अधिक मोठा दिसू शकतो. त्यामुळे स्लिम आणि सुबक दिसण्यासाठी मोनोक्रोमॅटिक लूक (म्हणजेच ब्लाउज, लेहेंगा आणि दुपट्टा एकाच गडद रंगाचा असणे) सर्वात उत्तम ठरतो.
५. योग्य फॅब्रिकची निवड :-
फुगीर किंवा कडक कापड (उदा. ऑर्गेन्झा किंवा नेट) तुम्हाला अधिक जाड दाखवू शकते. त्याऐवजी सिल्क, जॉर्जेट किंवा शिफॉन यांसारख्या अंगासरशी बसणाऱ्या कापडाचा लेहेंगा निवडा. फ्लोवी, खूप पातळ कापड पोटाच्या भागाला चिकटते. त्याऐवजी रॉ सिल्क, ब्रोकेड, बनारसी किंवा वेल्वेट कापडाचा लेहेंगा निवडा.
६. भरपूर हेव्ही वर्क असलेला लेहेंगा टाळा :-
पोटाच्या भागावर खूप हेव्ही एम्ब्रॉयडरी असल्यास लक्ष तिकडेच जातं. यासाठी हेव्ही वर्क लेहेंग्याच्या खालच्या बाजूला असलेला लेहेंगा अधिक चांगला दिसतो.
७. ब्लाऊजची लांबी वाढवा :-
जर तुम्हाला पोट अजिबात दाखवायचे नसेल, तर 'क्रॉप टॉप' ऐवजी थोड्या जास्त लांबीचा ब्लाऊज शिवा. यामुळे कंबरेकडील अतिरिक्त चरबी व्यवस्थित झाकली जाते. खूप टाईट किंवा खूप सैल ब्लाऊज टाळा. थोडा लांब, बॉडी-फिट पण कंफर्टेबल ब्लाऊज पोट झाकण्यास मदत करतो. पेप्लम ब्लाऊज हा यासाठी उत्तम पर्याय आहे.