हिवाळा सुरु झाला की सगळ्यात आधी आपल्या त्वचेवर त्याचा परिणाम दिसू लागतो. वातावरणातील गारव्यामुळे हात, पाय, टाचा, कोपर, गुडघे रखरखीत, कोरडे होतात.(winter dry skin remedy) अनेकांच्या त्वचेवर इतका कोरडेपणा येतो की पायाला भेगा पडतात. चालताना वेदना होतात. कधी कधी रक्तही येतं. महागडी क्रीम, बॉडी लोशन, मॉइश्चरायझर वापरुनही फारसा काही फरक पडत नाही.(coconut oil for dry skin) त्वचा वरुन मऊ वाटत असली तरी त्याला आतून पोषण मिळत नाही.(cracked hands and feet solution)
अशावेळी स्वयंपाकघरात आढळणारं नारळाचे तेल खूप उपयोगी पडते. नारळाचे तेल हे नैसर्गिक मॉइश्चरायझर असून त्यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात.(dry skin home remedy) हे तेल त्वचेवर खोलवर मुरते, कोरडेपणा कमी करते आणि त्वचेला नैसर्गिक चमक देते. नारळाचे तेल वापरण्याऐवजी त्यात काही घरगुती घटक मिसळले, तर त्याचा फायदा अनेक पटींनी वाढतो.(winter skincare tips)
गूळ काळा पडला, पाणी सुटले? गूळ साठवण्याची सोपी ट्रिक, वर्षभर राहिल फ्रेश- खराबही होणार नाही
ब्यूटी एक्सपर्टच्या मते ही क्रीम घरी बनवण्यासाठी १ टेबलस्पून शुद्ध तूप, १ चमचा नारळाचे तेल आणि ५ थेंब गुलाबाचे पाणी मिसळा. या घटकांपासून बनवलेल्या हँड क्रीमरचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. ही क्रीम बनवण्यासाठी सगळ्यात आधी तूप वितळवून घ्या. नंतर तूप क्रीमसारखे पांढरे होईपर्यंत नीट फेटून घ्या. नंतर त्यात नारळाचे तेल आणि गुलाब पाण्याचे थेंब मिसळा. काचेच्या बाटलीत भरुन हवं तेव्हा साठवा.
हे क्रीम लावण्यापूर्वी आपल्याला हात स्वच्छ धुवा आणि टॉवेलने हात पुसा. हातांना थोडीशी क्रीम लावा आणि नंतर हाता-पायांना व्यवस्थित चोळा. झोपण्यापूर्वी क्रीम वापरणे अधिक फायदेशीर ठरेल.
हिवाळ्यात त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर पुढे त्वचेच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे वेळीच उपाय करणं गरजेचं आहे. नारळाच्या तेलात ३ पदार्थ मिक्स केल्यास त्वेचाला आतून पोषण मिळते, भेगा भरुन निघतात आणि त्वचेला नैसर्गिक मऊपणा मिळतो. यामुळे थंडीच्या दिवसांत हा उपाय नक्कीच उपयोगी ठरतो.
