Underarms Cleaning Tips : सामान्यपणे सगळ्याच पुरूष आणि महिलांच्या शरीरावर केस असतात. डोक्यावरचे सोडून शरीरावर इतर ठिकाणी असलेले नकोशे केस दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. पण जास्तीत जास्त लोक हे केस दूर करण्यासाठी रेझरचा वापर करतात असं दिसतं. कारण ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. यानं लवकर शेव्हिंग होतं आणि कोणताही त्रास होत नाही.
मात्र, जास्तीत जास्त ब्युटी एक्सपर्ट्स खासकरून अंडरआर्म्सचे केस काढण्यासाठी रेजरऐवजी वॅक्सिंगला चांगला पर्याय मानतात. पण पार्लरला जाऊन वक्सिंग करणे सर्वांनाच शक्य होत नाही. शिवाय खर्चही जास्त येतो. अशात जर तुम्ही अंडरआर्म्सचे केस काढण्यासाठी रेझर वापरत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते.
रेझर वापरताना काय काळजी घ्यावी?
- काखेतील केस काढण्यासाठी मल्टी ब्लेड रेझरचा वापर करू नये. कारण याप्रकारच्या रेझरमुळे स्कीनवरील फार जवळचे केस ओढले जातात आणि कापले जातात, यानं स्कीनचं नुकसान होऊ शकतं. सोबतच त्वचेच्या खालील इनग्रोन केसही उगण्याची शक्यता अधिक वाढतो.
- धार खराब झालेल्या रेझरचा वापर अजिबात करू नका. क्लीन आणि चांगल्या शेव्हिंगसाठी शार्प रेझर किंवा इलेक्ट्रॉनिक ट्रिमरचा वापर करा. जर तुम्हाला वाटत असेल की, रेझर स्कीनवर स्मूथली चालत नाहीये, तर तुम्ही रेझर बदलायला हवं.
- अंडरआर्म्स शेव करण्याआधी त्या भागात आधी गरम पाणी लावा आणि २ ते ३ मिनिटे वाट बघून जेव्हा केस पूर्णपणे भिजतील तेव्हा शेव्हिंग करा.
- कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही अंडरआर्म्समध्ये शेव्हिंग जेलचा वापर करू शकता. असं केल्याने रेझरही स्कीनवर सहजपणे काम करेल.
- अंडरआर्म्समधील केस हे वेगवेगळ्या दिशेने उगवतात. अशात योग्य डायरेक्शनने रेझर फिरवणे गरजेचे आहे. सोबत रेझर फिरवताना स्कीन स्ट्रेच करायला विसरू नका.
- अंडरआर्म्सच्या शेव्हिंगनंतर एखादं क्रीम किंवा तेल लावा, याने स्कीन मुलायम राहण्यास मदत मिळेल.