Join us  

How To Remove Tan From Neck  : चेहरा गोरा अन् मान काळी पडलीये? शहनाज हुसैनं सांगितला मानेची त्वचा चमकवण्याचा सोपा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 11:56 AM

How To Remove Tan From Neck : मानेची त्वचा शरीराच्या इतर अनेक भागांपेक्षा पातळ असते आणि त्यामुळेच वाढत्या वयाची लक्षणे लवकर दिसू लागतात.

उन्हाळ्यात डीपनेक, स्लिव्ह्जलेस कपडे  वापरले जातात. पण मानेच्या काळपटपणामुळे अनेकजण हे करणे टाळतात. (Neck Tanning) मान हा शरीराचा एक भाग आहे ज्याकडे बहुधा दुर्लक्ष केले जाते. आपण चेहऱ्यावर खूप काही करतो, पण मान तशीच राहते.(Beauty expert shahnaz husain says how to get rid of dark neck fast) वय वाढीची सुरुवातीची चिन्हे नेहमी मानेवर दिसतात. आपण चेहऱ्यावर वेगवेगळ्या गोष्टी लावतो, पण नेक टॅनिंगकडे अजिबात लक्ष देत नाही. 

मानेची त्वचा शरीराच्या इतर अनेक भागांपेक्षा पातळ असते आणि त्यामुळेच वाढत्या वयाची लक्षणे लवकर दिसू लागतात. काळ्या मानेपासून सुटका कशी मिळवायची आणि त्यावर दिसणारी वाढत्या वयाची चिन्ह कशी कमी करायची यासाठी शेहनाज हुसैन (Shahnaz Husain) यांनी काही टिप्स दिल्या आहेत. (Neck tanning removal home remedies) शहनाज यांनी सांगितले की, यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या प्रकारे आपल्या चेहऱ्याकडे लक्ष देतो, त्याच प्रकारे आपण मानेकडे लक्ष द्यायला हवे. 

बहुतेक लोक दिवसातून दोनदा तोंड धुतात, पण मान धुवायला विसरतात. क्लींजिंग जेलने मान रोज स्वच्छ करावी. यामुळे मानेभोवतीची त्वचा उजळते. मान स्वच्छ करण्यासाठी कापसावर क्लिंजिंग जेल घेऊन ते चांगले पुसून घ्या आणि नंतर पौष्टिक क्रीम लावून मसाज करा. हा प्रयोग एक आठवडा सलग केल्यानं फरक दिसून येईल.

मानेची मसाज कशी करायची?

मानेला मसाज करताना नेहमी डाउनवर्ड स्ट्रोक निवडा. उर्वरीत स्ट्रोक त्वचेच्या उर्वरित भागात लावले जातात.  हनुवटीपासून छातीपर्यंत क्रिम, लोशन लावणं योग्य आहे. मसाज करताना हात नेहमी ओलसर असले पाहिजेत, कोरड्या त्वचेवर मसाज केल्याने त्वचेवर लवकर सुरकुत्या पडतात. जर तुमच्याकडे दिवसा वेळ नसेल, तर रात्री देखील केले जाऊ शकते जेणेकरुन तुमच्या मानेला व्यवस्थित मसाज करता येईल आणि हे उपचार रात्रभर प्रभावी ठरू शकतात.

 केस खूप पांढरे, पातळ होत चालले आहेत? काळ्या, लांबसडक केसांसाठी शहनाज हुसैनच्या खास टिप्स 

सनस्क्रीन लावणं विसरू नका

बहुतेक लोक ही चूक करतात की ते चेहऱ्यावर सनस्क्रीन लावतात, पण मानेवर लावत नाहीत. त्यामुळे मानेवरचे टॅनिंग आणखी वाढते. उन्हात बाहेर जाण्यापूर्वी २० मिनिटे आधी मानेवर सनस्क्रीन लावावे. ते फक्त पुढच्या बाजूलाच नाही तर मानेच्या मागच्या बाजूलाही लावा.

हाताची त्वचा खूप सैल पडलीये? २ सोपे उपाय, हातांवरच्या सुरकुत्या, काळपटपणा होईल दूर

मानेसाठी स्क्रब

मानेलाही शरीराच्या इतर भागांप्रमाणे एक्सफोलिएशनची गरज असते. तुम्ही बेसनाच्या पिठात दही मिसळा आणि नंतर चिमूटभर हळद घाला. हे सर्व मिसळून समोर आणि मागील दोन्ही बाजूंनी आपल्या मानेवर लावा. 20 मिनिटे राहू द्या  त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा.

जर तुमची मान खूप काळी दिसू लागली असेल, तर काळेपणा दूर करण्यासाठी थंड कच्चे दूध खूप फायदेशीर ठरू शकते. जर तुमच्या मानेवर सनबर्न झाला असेल तर ते बरे होण्यास मदत होईल. यासोबतच तुम्ही दही आणि चिमूटभर हळद एकत्र पॅक म्हणून मानेवर लावू शकता. अर्ध्या तासानंतर मान धुवा. या पॅकमुळे मानेमध्ये साचलेली घाण आणि काजळी निघून जाईल.

मानेची एंटी एजिंग ट्रिटमेंट

जर तुम्हाला मानेसाठी अँटी-एजिंग ट्रीटमेंट करायची असेल तर त्यात तिळाचे तेल टाकून मसाज करा. यासोबतच थोड्या वेळाने आंघोळ करावी. आंघोळ करताना मान कापडाने घासून घ्या. यासाठी लूफाही वापरता येईल. हे केवळ मानेसाठीच नाही तर हात, पाय आणि शरीराच्या इतर भागांसाठी देखील केले जाऊ शकते. जर तुम्ही मेकअप करण्याचा विचार करत असाल तर मानेवरही फाउंडेशनचा थर नक्कीच लावा. यामुळे तुमची नेकलाइन स्पष्ट होईल. तसेच, आपल्या मानेवर लूज पावडर लावा जेणेकरून बेस सेट होईल.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स