lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > Shahnaz Husain Tips For Hair Growth : केस खूप पांढरे, पातळ होत चालले आहेत? काळ्या, लांबसडक केसांसाठी शहनाज हुसैनच्या खास टिप्स 

Shahnaz Husain Tips For Hair Growth : केस खूप पांढरे, पातळ होत चालले आहेत? काळ्या, लांबसडक केसांसाठी शहनाज हुसैनच्या खास टिप्स 

Shahnaz Husain Tips For Hair Growth : सौंदर्य तज्ज्ञांच्या मते, लोक केस कसे धुवावेत याकडे कधीच लक्ष देत नाहीत. हेअर वॉशशी संबंधित या माहितीची तुम्हाला जाणीव असणे अत्यंत आवश्यक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 12:41 PM2022-05-15T12:41:23+5:302022-05-15T13:00:08+5:30

Shahnaz Husain Tips For Hair Growth : सौंदर्य तज्ज्ञांच्या मते, लोक केस कसे धुवावेत याकडे कधीच लक्ष देत नाहीत. हेअर वॉशशी संबंधित या माहितीची तुम्हाला जाणीव असणे अत्यंत आवश्यक आहे.

Shahnaz Husain Tips For Hair Growth : Beauty Expert Shahnaz Husain Tips To Protect Your Hair In Summer | Shahnaz Husain Tips For Hair Growth : केस खूप पांढरे, पातळ होत चालले आहेत? काळ्या, लांबसडक केसांसाठी शहनाज हुसैनच्या खास टिप्स 

Shahnaz Husain Tips For Hair Growth : केस खूप पांढरे, पातळ होत चालले आहेत? काळ्या, लांबसडक केसांसाठी शहनाज हुसैनच्या खास टिप्स 

प्रत्येकाला सुंदर आणि लांब केस हवे असतात. चांगली काळजी घेतल्यास केसांमधला फरकही लवकर दिसू शकतो. तथापि, उन्हाळ्यात हा प्रभाव कमी होतो, कारण या ऋतूत केसांची अधिक काळजी घेणे आवश्यक असते. (Hair Care Tips)  प्रखर सूर्यप्रकाशामुळे केसांचे नुकसान तर होतेच पण त्यासोबतच स्प्लिट एन्ड्स, कोरडेपणा आणि खालून खडबडीतपणा दिसून येतो. (Beauty Expert Shahnaz Husain Tips To Protect Your Hair In Summer)

तीव्र सूर्यप्रकाशामुळे केस पांढरे होऊ शकतात. त्याचबरोबर कडक उन्हात केवळ चेहराच नाही तर टाळूलाही घाम येतो, त्यामुळे केस मुळापासून कमकुवत होतात आणि नंतर केस गळण्याची समस्या सुरू होते. त्यामुळे स्कार्फच्या मदतीने कडक उन्हात त्याचे संरक्षण करणे आवश्यक आहे. सौंदर्य तज्ञ शहनाज हुसैन ( Shahnaz Husain Tips )यांच्या मते, सनस्क्रीनयुक्त सीरम आणि हेअर क्रीम देखील कडक सूर्यप्रकाशात केसांवर वापरता येते. केसांची योग्य काळजी घेण्यासाठी त्यांनी काही टिप्स शेअर केल्या आहेत. 

केसांना फाटे फुटले असतील तर काय करावे?

जर तुमच्या केसांना सतत फाटे फुटत असतील तर सर्वप्रथम तुम्ही ट्रिमिंग करून घ्या. हे केस खराब झाल्याचे लक्षण  आहे, असे केस पुन्हा दुरुस्त करता येत नाहीत. त्यामुळे लांबी लक्षात घेऊन ट्रिमिंग करा. हे पुन्हा घडू नये म्हणून आठवड्यातून एकदा केसांना मुळापासून टोकापर्यंत तेल लावा.  खोबरेल आणि तिळाचे तेल हलके गरम करून टाळू आणि केसांना मसाज करा. त्यानंतर रात्रभर असेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी तुमचे केस शाम्पू आणि कंडिशनरने चांगले धुवा. त्याच वेळी, केसांना स्टाइलिंग टूल्स किंवा ड्रायरपासून शक्य तितके दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.

केस धुण्याची योग्य पद्धत

सौंदर्य तज्ज्ञांच्या मते, लोक केस कसे धुवावेत याकडे कधीच लक्ष देत नाहीत. हेअर वॉशशी संबंधित या माहितीची तुम्हाला जाणीव असणे अत्यंत आवश्यक आहे. कोरडे केस आठवड्यातून दोनदा धुतले जाऊ शकतात, परंतु कमी शाम्पू वापरा. दुसरीकडे, केस तेलकट असल्यास, आपल्याला अधिक प्रमाणात शाम्पूची आवश्यकता असू शकते. जर तुमच्या टाळूला घाम येत असेल किंवा जास्त तेल निघत असेल तर तुम्ही सौम्य हर्बल शैम्पू वापरू शकता. त्यानंतर केस पाण्याने चांगले धुवावेत. 

उपाय

शाम्पूनंतर केस चांगले धुणे आवश्यक आहे, जेणेकरून फेस व्यवस्थित बाहेर येईल. मात्र, काही घरगुती वस्तूंच्या मदतीनेही केस धुवता येतात. यासाठी पाण्यात चहाची पाने टाका आणि गरम करण्यासाठी ठेवा. थोडा वेळ उकळू द्या आणि नंतर एका भांड्यात गाळून घ्या. आता चहाच्या पाण्यात लिंबाचा रस घाला. केसांच्या लांबीनुसार प्रमाण ठेवा. आता या पाण्याने केस चांगले धुवा.

 केस फारच पांढरे व्हायला लागलेत? काळ्याभोर, दाट केसांसाठी सकाळ-संध्याकाळ करा फक्त १ सोपा उपाय

शहनाज सांगतात की, चहाच्या पानाच्या पाण्याव्यतिरिक्त, तुम्ही तुमचे केस बिअरनेही धुवू शकता. यामुळे केस गुळगुळीत आणि चमकदार दिसतील. यासाठी बिअर घ्या आणि त्यात लिंबाचा रस मिसळा. आता हे मिश्रण केसांना लावा आणि 5 मिनिटे तसेच राहू द्या. 5 मिनिटांनंतर केस सामान्य पाण्याने चांगले धुवा.

शहनाज हुसैन यांच्या मते, केसांच्या समस्यांवर मात करण्यासाठी आहार आणि व्यायाम देखील महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे फळे आणि पौष्टिक भाज्यांचा आहारात समावेश करा. वास्तविक, कोणत्याही समस्येवर मात करण्यासाठी आहार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यामुळे शरीरातील पोषक तत्वांची कमतरता पूर्ण होते. दररोज एक वाटी कडधान्ये आणि सलाड आणि फळे खा. जर तुमची टाळू तेलकट असेल किंवा डोक्यातील कोंड्याची समस्या असेल तर शक्य तितके पाणी प्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही रोज सकाळी एक ग्लास लिंबू पाणी पिऊ शकता. हा एक प्रभावी उपाय मानला जातो.

Web Title: Shahnaz Husain Tips For Hair Growth : Beauty Expert Shahnaz Husain Tips To Protect Your Hair In Summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.