Join us
Daily Top 2Weekly Top 5

कपाळावर बारीक रेषा-डोळ्यांजवळ सुरकुत्या? १० रूपयांचं जायफळ असं लावा, टाईट होईल स्किन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 11:56 IST

How To Remove Pigmentation From Skin : जायफळाच्या वापरानं त्वचेतील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

सुरकुत्या, डाग पिग्मेंटेशन यांसारख्या त्वचेच्या समस्या प्रत्येकालाच उद्भवतात. या पासून सुटका मिळवण्यासाठी महागड्या उत्पादनांची  गरज नाही. स्वंयपाकघरातील जायफळ वापरून तुम्ही क्लिन,  ग्लोईंग चेहरा मिळवू शकता (How To Remove Pigmentation From Skin). यातील एंटी ऑक्सिडेंट्स, एंटी बॅक्टेरिअल गुण त्वचेला उजळवण्याचं काम करतात. जायफळाच्या वापरानं त्वचेतील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. जायफळाचा वापर करून तुम्ही चेहर्‍याची काळजी घेऊ शकता. (How To Remove Pigmentation From Skin Using Jaifal Nutmug)

जायफळ आणि दुधाचा फेस पॅक

जायफळ आणि कच्चं दूध त्वचेला नैसर्गिकरित्या ब्राईट आणि स्मूद बनवतं. एक छोटा चमचा ताजं जायफळ उगळवून त्यात १ चमचा कच्चं दूध मिसळा आणि पेस्ट तयार करा. सुरकुत्या असलेल्या भागांवर १० ते १५ मिनिटांसाठी लावून तसंच ठेवा. नंतर हलक्या हातानं मसाज करून थंड पाण्यानं धुवून घ्या. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय  केल्यास चांगला परिणाम दिसून येईल.

जायफळ आणि मधाचा फेस पॅक

जायफळ आणि मध मिसळून चेहऱ्याला लावल्यास त्वचा मऊ आणि क्लिअर होते. एक चमचा जायफळ पेस्टमध्ये एक चमचा मध मिसळून चेहऱ्यावर १५ मिनिटांसाठी लावा नंतर कोमट पाण्यानं धुवून घ्या. ज्यामुळे डाग-हलके होण्यास मदत होईल आणि त्वचा नैसर्गिकरित्या चमकेल.

जायफळ, लिंबू आणि हळद

अर्धा चमचा जायफळमध्ये काही थेंब लिंबू आणि एक चिमूटभर हळद मिसळून पेस्ट तयार करा. हे मिश्रण सुरकुत्यांवर १० ते १५ मिनिटं लावून ठेवा नंतर पाण्यानं चेहरा धुवा. हा पॅक त्वचेला मॉईश्चराईज करण्यासोबत डाग काढून टाकण्यास मदत करेल. सेसिटिव्ह स्किन असल्यास लिंबाचे प्रमाण कमी ठेवा किंवा पॅकमध्ये लिंबू घालणं टाळा.

जायफळ आणि दही

एक चमचा जायफळ पावडरमध्ये एक चमचा दही मिसळून पेस्ट तयार करून घ्या नंतर चेहऱ्याला लावून सुकू द्या. ज्यामुळे फक्त सुरकुत्या कमी होत नाही तर स्किन टोन ब्राईट होण्यास मदत होते. जायफळाचा कोणताही पॅक वापरल्यानंतर सनस्क्रीन आणि मॉईश्चराईजर लावा. आठवड्यातून २ किंवा ३ वेळा हा पॅक वापरा. जायफळचा वापर करण्याआधी पॅच टेस्ट करा.

English
हिंदी सारांश
Web Title : Nutmeg for wrinkles? Tighten skin with this simple home remedy.

Web Summary : Fight wrinkles and pigmentation with nutmeg! This spice offers antioxidant and antibacterial properties. Use it with milk, honey, lemon, or yogurt for brighter, smoother skin. Regular use reduces wrinkles and lightens blemishes. Always moisturize and patch test first.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी