सुंदर चेहरा (Skin Care Tips) मिळवण्यासाठी लोकांची काहीही करण्याची तयारी असते. धावपळीच्या जीवनात स्वत:च्या त्वचेची काळजी घेणं एखाद्या टास्कप्रमाणे एसते. वाढतं प्रदूषण, पोषणाची कमतरता, निष्काळजीपणा यामुळे चेहरा कोरडा आणि निस्तेज होतो. हिवाळ्याच्या दिवसांत चेहऱ्याचं मॉईश्चर कमी होते. (How To Remove Or Lighten Dark Spots)
या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रोडक्ट्सचा वापर करू शकता. सोशल मीडियावर एक उपाय व्हायरल होत आहे. पाकिस्तानी डॉक्टरनं हा उपाय सुचवला आहे ज्यामुळे चेहऱ्यावरील डाग निघून जाण्यास मदत होईल आणि चेहरा चमकदार दिसेल. (How To Remove Or Lighten Dark Spots And Wrincles From Face Remedy Shared By Pakistani Doctor)
पाकिस्तानी डॉक्टर शिरिन फातिमा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांनी त्वचेशी संबंधित एक उपाय शेअर केला आहे. शिरिन फातिमा सांगतात की हा उपाय त्वचेसाठी फायदेशीर ठरतो. डॉ. शिरिन यांनी त्वचेवरचे डाग दूर करण्यासाठी एक परिणामकारक उपाय शेअर केला आहे. ज्यामुळे चेहऱ्यावरचे डाग दूर होण्यास मदत होईल. सुरकुत्या, डोळ्यांखालचे सर्कल्स, वाढत्या वयाचे निशाण आपोआप कमी होतील.
सगळ्यात आधी बाजारातून ताजे, रसाळ बीट विकत घेऊन याच नंतर बीटाचे साल काढून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. नंतर वाटलेल्या बिटाचा रस काढून एका बाऊलमध्ये घाला. नंतर यात २ चमचे मिल्क पावडर घालून व्यवस्थित मिसळा. मग एक पेस्ट तयार होईल. ही पेस्ट चेहऱ्याला व्यवस्थित लावून ठेवा. पेस्ट सुकेल तेव्हा साध्या पाण्यानं चेहरा धुवा. नंतर चेहरा ओल्या कापडानं पुसून घ्या यामुळे तुमचा चेहरा पूर्ण स्वच्छ झालेला दिसून येईल.
बिटाच्या रसाचे फायदे
बीट स्किन केअरसाठी बराच फायदेशीर ठरतो. यातील बीटा लेंस ब्लड फ्लो वाढतात ज्यामुळे त्वचा चमकदार दिसते. बीटात व्हिटामीन सी बरोबरच अनेक एंटी ऑक्सिडेंट्सही असतात. ज्यामुळे काळे डाग निघून जाण्यासह वय वाढीच्या खुणाही कमी होतात. बीट व्हिटामीन सी आणि ई कोलेजन वाढवते. ज्यामुळे त्वचा दीर्घकाळ तरूण दिसते. याच्या वापरानं डेड सेल्स कमी होतात, त्वचा मऊ-मुलायम होते. पिग्मेंटेनशन कमी होते आणि चेहरा सुंदर दिसतो.
मिल्क पावडरचे त्वचेला फायदे
मिल्क पावडरच्या वापरानं त्वचेला भरपूर फायदे मिळतात. ही पावडर चेहऱ्याला लावल्यानं त्वचेचा रंग क्लिन होतो आणि त्वचेवर ग्लो येतो. त्वचा मऊ होते, डाग हळूहळू कमी होतात. मिल्क पावडर त्वचेवर लावल्यानं टिश्यू रिजनरेट होतात. याच्या मदतीने एक्ने वल्गॅरिस आणि प्लाक सोरायसिस ट्रिटमेंट करू शकता. यामुळे सिबम उत्पादन कंट्रोल होते. मिल्क पावडर त्वचेला मॉईश्चराईज करण्यासोबतच टोनिंग, स्मूदिंग करते.