Lokmat Sakhi >Beauty > फेशियल हेअर रिमूव्हलचा घरगुती उपाय! वेदना न होता केस निघतील सहज - वॅक्सिंग, थ्रेडींग विसरा!

फेशियल हेअर रिमूव्हलचा घरगुती उपाय! वेदना न होता केस निघतील सहज - वॅक्सिंग, थ्रेडींग विसरा!

How to Remove Facial Hair Naturally At Home : Facial Hair Removal Home Remedy : Home Remedy for Removing Facial Hair : Best Natural Way to Remove Facial Hair Permanently : नैसर्गिक पदार्थांच्या मदतीने कुठल्याही वेदनेशिवाय फेशियल हेअर रिमूव्ह कसं करायचं ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2025 22:05 IST2025-07-03T22:00:00+5:302025-07-03T22:05:02+5:30

How to Remove Facial Hair Naturally At Home : Facial Hair Removal Home Remedy : Home Remedy for Removing Facial Hair : Best Natural Way to Remove Facial Hair Permanently : नैसर्गिक पदार्थांच्या मदतीने कुठल्याही वेदनेशिवाय फेशियल हेअर रिमूव्ह कसं करायचं ते पाहा...

How to Remove Facial Hair Naturally At Home Facial Hair Removal Home Remedy Home Remedy for Removing Facial Hair | फेशियल हेअर रिमूव्हलचा घरगुती उपाय! वेदना न होता केस निघतील सहज - वॅक्सिंग, थ्रेडींग विसरा!

फेशियल हेअर रिमूव्हलचा घरगुती उपाय! वेदना न होता केस निघतील सहज - वॅक्सिंग, थ्रेडींग विसरा!

चेहऱ्यावरील अनावश्यक केस आपले सौंदर्य आणि संपूर्ण लूकच (Facial Hair Removal Home Remedy) खराब करतात. बहुतेकजणी चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यासाठी वॅक्सिंगचा पर्याय निवडतात परंतु प्रत्येकीच्याच त्वचेला ते सहन होतंच असं नाही. यातही जर एखादीची त्वचा फारच नाजूक आणि संवेदनशील असेल तर वॅक्सिंग त्रासदायक ठरू शकतं(How to Remove Facial Hair Naturally At Home).

काहीजणींच्या त्वचेला वॅक्सिंगमुळे लालसरपणा, पुरळ किंवा इरिटेशनचा त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत, त्वचेला इजा होऊ न देता तसेच त्वचेची योग्य ती काळजी घेऊनच वॅक्सिंग करणे सोयीचे ठरते. यासाठीच, चेहऱ्यावरील नाजूक त्वचेसाठी विकतच्या वॅक्सऐवजी इतर नैसर्गिक, सोपे आणि घरगुती उपायच अधिक सुरक्षित आणि परिणामकारक ( Home Remedy for Removing Facial Hair) ठरू शकतात. फेशियल हेअर रिमूव्ह अगदी सहजपणे करण्यासाठी घरच्याघरीच काही पदार्थांच्या मदतीने घरगुती, नैसर्गिक वॅक्स तयार करू शकतो. नैसर्गिक पदार्थ वापरुन घरच्या घरी कुठल्याही वेदनेशिवाय (Best Natural Way to Remove Facial Hair Permanently) फेशियल हेअर रिमूव्ह करण्यासाठी काय करायचं ते पाहा... 

साहित्य :- 

१. पाणी - १/२ कप 
२. साखर - २ टेबलस्पून 
३. बेसन - १ टेबलस्पून 
४. हळद - १/२ टेबलस्पून 

कृती :- 

सगळ्यांतआधी एका भांड्यात थोडे पाणी घेऊन ते हलकी उकळी येईपर्यंत व्यवस्थित गरम करून घ्यावे. त्यानंतर या गरम पाण्यांत साखर, बेसन, हळद घालावी. आता हे सगळे जिन्नस चमच्याने हलवून पाण्यांत कालवून घ्यावेत. मग हे मिश्रण थोडे चिकट आणि घट्ट होईपर्यंत हलकेच गरम करून घ्यावे. मिश्रणाला थोडा चिकटपणा आल्यावर गॅस बंद करुन ते तयार घरगुती फेशियल वॅक्स एका बाऊलमध्ये काढून घ्यावे. आपले घरगुती पदार्थांपासून तयार केलेलं फेशियल वॅक्स वापरण्यासाठी तयार आहे. 

काळीकुट्ट दिसते पाठ ? ५ टिप्स, पाठ दिसेल स्वच्छ आणि खाज फोडही येणार नाहीत...

याचा वापर कसा करायचा ? 

या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे, सगळ्यातआधी एका कापडी पिशवीचे छोटे - छोटे तुकडे करुन घ्यावेत. त्यानंतर हे तयार करून घेतलेलं घरगुती वॅक्स बोटांच्या मदतीने चेहऱ्यावरील केसांवर लावून घ्यावे. मग कापडी पिशवीचे छोटे तुकडे त्यावर लावून हलकेच दाब देऊन १ ते २ सेकंद हलकेच मसाज करावा आणि त्यानंतर वॅक्सिंग पट्टी हलकेच खेचून काढावी. आपण पाहू शकता की, चेहऱ्यावरील केस या कापडी पट्टीला चिकटून अगदी सहजपणे फेशियल हेअर रिमूव्ह झालेले असेल. 

मूठभर तुळशीची पाने, चमचाभर गुलाबपाणी, केसांसाठी करा औषधी टोनर - असरदार घरगुती उपाय...


फेस फॅट वाढून चेहरा वयस्क - थोराड दिसतो? ५ सवयी, तारुण्य परत येईल कायमचं...

हे घरगुती वॅक्स वापरण्याचे फायदे... 

१. साखर :- त्वचेचं सौम्य एक्सफोलिएशन करून डेड स्किन दूर करते आणि त्वचेला नैसर्गिक चमक देते.

२. बेसन :- त्वचेला स्वच्छ करून टॅनिंग कमी करतं आणि त्वचा मऊ व उजळ करते. 

३. हळद :- त्वचेवरील पिंपल्स, पुरळ कमी करून ती निरोगी व कायम चमकदार ठेवण्यास फायदेशीर ठरते.

Web Title: How to Remove Facial Hair Naturally At Home Facial Hair Removal Home Remedy Home Remedy for Removing Facial Hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.