बऱ्याच जणींच्या कपाळावर, ओठांच्यावर किंवा नाकाखालच्या भागात फेशियल हेअर असतात. एवढंच नाही तर कानाच्या आसपासही बरेच केस असतात. चेहऱ्यावरच्या केसांचं प्रमाण वाढलं की मग आपोआपच सौंदर्य कमी होतं. चेहरा काळवंडल्यासारखा दिसतो. म्हणूनच बऱ्याच जणींना वारंवार पार्लरमध्ये जाऊन फोरहेड, अप्परलिप्स करावं लागतं. म्हणूनच आता घरच्याघरी फेशियल हेअर काढण्याची एक ट्रिक पाहून घ्या (how to remove facial hair?). हा उपाय अतिशय सोपा असून सुरक्षित आहे (home hacks to remove facial hair). त्यामुळे एकदा ट्राय करून बघाच..(home made wax to remove facial hair)
घरच्याघरी फेशियल हेअर कसे काढावे?
खूप वेगवेगळ्या पद्धतींनी घरच्याघरी चेहऱ्यावरचे केस काढता येतात. त्यापैकी काही सोप्या पद्धती पाहूया..
१. पहिला उपाय करण्यासाठी आपल्याला साखर, लिंबू आणि मध वापरायचा आहे. हा उपाय करण्यासाठी एक चमचा साखर, १ चमचा मध आणि १ चमचा लिंबाचा रस एका पातेल्यामध्ये एकत्र करून थोडं गरम करा.
१० मिनिटांत सोन्यासारखा उजळून निघेल चेहरा, चमचाभर मध 'असे' चेहऱ्यावर चोळा- टॅनिंग गायब
जेव्हा साखर विरघळून हे तिन्ही पदार्थ व्यवस्थित एकजीव होतील तेव्हा गॅस बंद करा. आता हा लेप थोडा गरम असतानाच चेहऱ्यावर जिथे केस असतील तिथे लावा. त्यावर एक सुती कपडा ठेवा आणि थोडंसं जोर लावून कपडा ओढून घ्या. पण हा उपाय खूप सावकाशपणे करावा. तसेच आधी पॅचटेस्ट जरूर घ्यावी.
२. कच्च्या पपईचा गर देखील चेहऱ्यावरचे केस काढून टाकण्यासाठी उपयोगी ठरतो. हा उपाय करण्यासाठी कच्च्या पपईचा गर काढा. त्यात थोडी पिठीसाखर आणि थोडी हळद मिसळा.
हा लेप चेहऱ्याला लावून हलक्या हाताने मालिश करून चेहरा चोळा. आठवड्यातून २ वेळा हा उपाय करा. हळूहळू चेहऱ्यावरचे केस कमी होतील..
