lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > डार्क सर्कल्समुळे रोज मेकअप करावा लागतो? झोपण्याआधी २ गोष्टी लावा-डार्क सर्कल्स होतील गायब

डार्क सर्कल्समुळे रोज मेकअप करावा लागतो? झोपण्याआधी २ गोष्टी लावा-डार्क सर्कल्स होतील गायब

How to Remove Dark Circles Quickly (Dark circles kase ghalvayche) : व्हिटामीन्सची कमतरता आणि चुकीच्या लाईफस्टाईलमुळे अशी समस्या उद्भवू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 10:39 AM2024-04-22T10:39:08+5:302024-04-22T18:55:39+5:30

How to Remove Dark Circles Quickly (Dark circles kase ghalvayche) : व्हिटामीन्सची कमतरता आणि चुकीच्या लाईफस्टाईलमुळे अशी समस्या उद्भवू शकते.

How to Remove Dark Circles Quickly : Home Remedies For Dark Circles Removal | डार्क सर्कल्समुळे रोज मेकअप करावा लागतो? झोपण्याआधी २ गोष्टी लावा-डार्क सर्कल्स होतील गायब

डार्क सर्कल्समुळे रोज मेकअप करावा लागतो? झोपण्याआधी २ गोष्टी लावा-डार्क सर्कल्स होतील गायब

डोळ्यांखाली काही वर्तुळं येणं काही नवीन नाही पण यामुळे  तब्येतीवर  ओव्हलऑल शरीरावर आणि चेहऱ्यावर चुकीचा परिणाम दिसून येतो. (How to Get Rid From Dark Circles) व्हिटामीन्सची कमतरता आणि चुकीच्या लाईफस्टाईलमुळे अशी समस्या उद्भवू शकते. रात्री उशीरापर्यंत जागल्यामुळे दीर्घकाळ लॅपटॉप फोन स्किन बघत राहिल्यामुळे डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे येतात. (Dark Circles Ghalvnysathi Kay Karave)

ज्यामुळे तुम्ही वयाआधीच म्हातारे दिसता आणि त्वचा डल दिसू लागते.  हे टाळण्यासाठी अनेकजण अंडरआय क्रिम अप्लाय करतात. काळ्या वर्तुळांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकता रात्री झोपण्यापूर्वी २ वस्तूं डोळ्यांच्या खाली लावा. ज्यामुळे चांगला परिणाम दिसून येईल. (Dark Circle Removal Tips)

अभ्यासानुसार अनेकांची झोपेची गुणवत्ता खराब असते. त्यामुळे त्यांना डार्क सर्कल्स उद्भवतात. चांगली झोप, पोषक आहार घेऊन तुम्ही डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता. ज्या लोकांना डोळ्यांखाली रक्तवाहिन्यांशी संबंधित समस्या उद्भवत आहेत. (Ref) त्यांना कोल्ड कम्प्रेसचा फायदा होऊ शकतो. कोल्ड कॉम्प्रेसमुळे रक्तवाहिन्या चांगल्या राहण्यास मदत होते. डोळ्यांभोवतीची सूज आणि काळा रंग कमी होण्यासही मदत होते. 

काकडी

काकडीत व्हिटामीन सी आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळे त्वचा डायड्रेट राहण्यास मदत होते. डोळ्यांवर ठेवण्याासाठी काकडीचे स्लाईस एकदम पातळ कापून  घ्या. त्यानंतर डोळ्यांच्या खाली १५ मिनिटांसाठी ठेवा. हा उपाय केल्याने काही दिवसांतच तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल.

ऊन्हाळ्यात जेवणाबरोबर कांदा खावा की नाही? ९० टक्के लोक असतात कन्फ्यूज; कांदा खाण्याचे ५ फायदे

एलोवेरा जेल

एलोवेरा जेलमध्ये हायड्रेटींग गुणधर्म असतात. यासाठी बोटांवर थोडं जेल घेऊन डोळ्यांच्या खालच्या भागाला हलक्या  हाताने लावून मसाज करा.  ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते. डोळ्यांच्या खालची काळी वर्तूळ दूर होण्यास मदत होईल. ज्यामुळे चेहराही ग्लोईंग दिसेल.

हा उपायसुद्धा करून पाहा

केळ्याची सालं डोळ्यांच्या खाली लावल्याने काले डाग, सुरकुत्या कमी होतात. या याच्या सालीचा वापर करून सगळ्यात आधी चेहरा स्वच्छ धुवून  घ्या. त्यानंतर हलक्या हाताने चेहरा धुवून स्वच्छ करा. नंतर केळ्याची सांल डोळ्यांच्या खाली हाताने मालिश करत जवळपास १० मिनिट तसंच ठेवा. यामुळे काही दिवसांतच तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल.
 

Web Title: How to Remove Dark Circles Quickly : Home Remedies For Dark Circles Removal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.