सतत घाम येणं, धूळ-माती यांमुळे शरीराचे बरेच पार्ट्स काळे पडतात. खासकरून अंडरआर्म्स, मांड्या, प्रायव्हेट पार्ट्स काळपट होतात. बरेच लोक काळे झालेले भाग स्वच्छ करण्यासाठी केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर करतात. नॅच्युरल आणि स्वस्त उपाय करून तुम्ही मांड्याचा काळेपणा दूर करू शकता. डॉक्टरांनी स्वत:हा उपाय सांगितला आहे.(How To Remove Black Spots In a Private Area Ask Your Doctor What To Apply On Your Private Parts)
मुल्तानी माती उपयुक्त
डॉ. उपासना वोहरा सांगतात की तुम्हाला प्रायव्हेट पार्ट्सचा काळेपणा दूर करायचा असेल तर मुल्तानी माती हा सगळ्यात असरदार उपाय आहे. यासाठी तुम्हाला फक्त थोडीशी मुल्तानी माती लागेल. यात थोडं पाणी मिसळून एक पातळ पेस्ट तयार करा नंतर हा लेप रोज लावून प्रायव्हेट पार्ट्सच्या वरच्या त्वचेवर लावा. सुकल्यानंतर पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या. सतत हा उपाय केल्यानं चांगला परीणाम दिसून येईल. हळूहळू त्वचेचा रंग हलका होऊन नॅच्युरल दिसायला सुरूवात होईल.
मुल्तानी माती फक्त प्रायव्हेट पार्ट्सवर नाही तर मांड्या, अंडरआर्म्स किंवा कोपरांवरही परीणामकारक ठरतात. ज्या ठिकाणी स्किन वारंवार रगडून डार्क झालेली असते. त्या ठिकाणी रोज मुल्तानी माती लावल्यानं त्वचा स्वच्छ, साफ, मुलायम आणि फ्रेश होते.
इतर घरगुती उपाय
जर तुमच्याकडे मुल्तानी माती नसेल तर तुम्ही काही खास घरगुती पदार्थांचा वापरही करू शकता. जसं की हळद आणि काकडीची पेस्ट. हळद स्किन पिग्मेंटेशन कमी करते आणि नॅच्युरल ग्लो देते तर काकडी त्वचेला गारवा देते आणि त्वचा सॉफ्ट बनवते.
नारळाचे तेल लावल्याने त्वचेतील घर्षण कमी होण्यास मदत होते आणि त्यामुळे काळेपणा तसेच रॅशेस येणे कमी होऊ शकते. यात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. मांड्यांच्या भागात ओलावा टाळण्यासाठी किंवा घाम शोषून घेण्यासाठी बेबी पावडर किंवा घामोळ्यांसाठी वापरली जाणारी पावडर लावा. यामुळे त्वचा कोरडी राहण्यास आणि घर्षण कमी होण्यास मदत होते.
हॉटेलसारखा कुरकुरीत डोसा घरीच करा; १० ट्रिक्स-डोश्याचं पीठ छान फुलेल, डोसा परफेक्ट होईल
घट्ट किंवा जाड कपड्यांमुळे घाम येऊन आणि घर्षणाने काळेपणा वाढू शकतो. त्यामुळे शक्यतो सुती आणि थोडे सैल कपडे घाला. जर तुम्हाला खाज, जळजळ किंवा जखमांसारखा जास्त त्रास होत असेल, तर त्वचा-तज्ज्ञांचा सल्ला घेणे सर्वात उत्तम.
