Lokmat Sakhi >Beauty > महागड्या पार्लरचा खर्च नको! स्वयंपाकघरातील २ पदार्थ चेहरा करेल ग्लो - पिंपल्स- फोडांचे डाग होतील कमी

महागड्या पार्लरचा खर्च नको! स्वयंपाकघरातील २ पदार्थ चेहरा करेल ग्लो - पिंपल्स- फोडांचे डाग होतील कमी

home remedies for pimples: natural face care: pimple marks removal tips: चेहऱ्यावरील पिंपल्स आणि फोडांचे डाग कमी करण्यासाठी स्वयंपाकघरातील हे पदार्थ वापरा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2025 09:30 IST2025-09-13T09:30:00+5:302025-09-13T09:30:02+5:30

home remedies for pimples: natural face care: pimple marks removal tips: चेहऱ्यावरील पिंपल्स आणि फोडांचे डाग कमी करण्यासाठी स्वयंपाकघरातील हे पदार्थ वापरा.

how to reduce pimples naturally at Home kitchen ingredients for glowing skin best natural remedies for acne marks | महागड्या पार्लरचा खर्च नको! स्वयंपाकघरातील २ पदार्थ चेहरा करेल ग्लो - पिंपल्स- फोडांचे डाग होतील कमी

महागड्या पार्लरचा खर्च नको! स्वयंपाकघरातील २ पदार्थ चेहरा करेल ग्लो - पिंपल्स- फोडांचे डाग होतील कमी

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे धूळ, प्रदूषण, स्ट्रेस आणि अनियमित झोपेमुळे त्वचेवर परिणाम होतो.(Skin care tips) यामुळे पिंपल्स येणे, चेहऱ्यावर इन्फेक्शन होणं, फोडांचे डाग कायम राहणं यांसारख्या समस्या सतावतात.(Pimples issue) यासाठी आपण महागडे फेशियल किंवा स्किन ट्रीटमेंट्स घेतल्या जातात. पण याचा परिणाम आपल्या त्वचेवर तात्पुरता असतो.(Home remedies for pimples)  केमिकल्समुळे कधीकधी स्किन जास्त प्रमाणात सेंसिटिव्ह किंवा कोरडी होते. (Natural Face care) 
महागड्या पार्लर ट्रीटमेंट्स आणि केमिकलयुक्त क्रीम्स वापरुनही पिंपल्स, फोडांचे डाग आणि चेहऱ्यावरील निस्तेजपणा कमी होत नाही अशी अनेकांची तक्रार असते. (pimple marks removal tips) त्वचेवरील नैसर्गिक ग्लो आणि हेल्दीपणा परत आणण्यासाठी आपल्याला अधिकचे पैसे खर्च करावे लागतात. पण स्वयंपाकघरात असणाऱ्या दोन पदार्थांनी आपण चेहऱ्याचं गेलेलं सौंदर्य पुन्हा आणू शकतो.(glowing skin hacks) तसेच यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स आणि फोडांचे डाग कमी होण्यास मदत होईल. 

रोज लावा जास्वंदीच्या फुलांचे ‘हे’ तेल- महिनाभरात दिसेल फरक, डोक्यावरचा एक केस गळणार नाही

स्वयंपाकघरात आढळणारी दालचिनी आणि तमालपत्र आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. हे आपल्या मुरुमांसाठी आणि त्वचेच्या संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. या फेस पॅकचा नियमित वापर केल्याने त्वचा चमकण्यास मदत होईल. तसेच डागदेखील कमी होतात. 

दालचिनीमध्ये अँटी-फंगल आणि अँटी - बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. जे मुरुम आणि त्वचेवरील बॅक्टेरियांशी लढण्यास मदत करतात. त्वचेची जळजळ देखील कमी होते, ज्यामुळे चेहऱ्यावरील मुरुमे हळूहळू कमी होऊ लागतात. तमालपत्रांमध्ये लोह, तांबे, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक दालचिनीसोबत एकत्र करुन त्वचेचे पोषण करतात. हा फेसपॅक वाढत्या वयानुसार येणाऱ्या सुरकुत्या आणि बारीक रेषा नियंत्रित करण्यास देखील मदत करतात. या पॅकमध्ये असलेले दालचिनी, मध आणि तमालपत्र त्वचेचा रंग राखण्यास मदत करते. तसेच टॅनिंग आणि डाग कमी करण्यास देखील मदत होते, ज्यामुळे त्वचा उजळून सुंदर होते. 

फेसपॅक बनवण्यासाठी आपल्याला २ चमचे दालचिनी पावडर, १ चमचा तमालपत्र पावडर, २ चमचे मध , १ चमचा लिंबाचा रस आणि कच्चे दूध एकत्र करावे लागेल. हा फेसपॅक लावण्यापूर्वी, हलक्या फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवा. तयार केलेला फेसपॅक चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. १५ ते २० मिनिटे सुकू द्या. पॅक सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. त्यानंतर हलके मॉइश्चरायझर लावा. आठवड्यातून दोनदा हा फेसपॅक वापरा. हा फेसपॅक लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करुन पाहा. 
 

Web Title: how to reduce pimples naturally at Home kitchen ingredients for glowing skin best natural remedies for acne marks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.