चेहऱ्यावर पिंपल्स, ॲक्ने, पिगमेंटेशन येणं याचं प्रमाण आता खूप वाढलेलं आहे. शरीरात होणाऱ्या काही बदलांचा परिणाम आपल्या त्वचेवर दिसत असतो आणि त्यातूनच त्वचेचे वेगवेगळे त्रास सुरू होतात. हे त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय नक्कीच खूप उपयाेगी पडतात. त्यापैकीच काही आयुर्वेदिक उपाय आपण पाहणार आहोत. ॲक्ने, पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स अशा त्रासांवर जर आपण अभ्यासपुर्ण उपाय केले, तर हे त्रास लवकर कमी होतील. त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहुया..(how to use mulethi powder to get rid of tanning, pigmentation and dark spots?)
पिगमेंटेशन, ॲक्ने, डार्क स्पॉट्स कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय
चेहऱ्यावरचे वाढलेले पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स आणि ॲक्ने कमी करण्यासाठी कोणता आयुर्वेदिक उपाय करता येऊ शकतो, याविषयीची माहिती drvaraayurveda या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. हे त्रास प्रामुख्याने रक्तदोष आणि पित्त दोष यामुळे सुरू होतात. ते कमी करण्यासाठी ज्येष्ठमध अतिशय उपयोगी ठरतो, असं सुचविण्यात आलं असून तो नेमका कसा वापरायचा ते पाहुया...
महिलांसाठी सुपरफूड असणारे 'हे' पदार्थ तुम्हाला माहिती आहेत का? रोज खा- ठणठणीत राहाल
१. जर चेहऱ्यावरचं टॅनिंग खूप वाढलं असेल तर ज्येष्ठमधाची पावडर आणि ॲलोव्हेरा जेल एकत्र करून चेहऱ्याला लावा. १० मिनिटे चेहरा तसाच राहू द्या आणि त्यानंतर धुवून टाका. ज्येष्ठमध आणि ॲलोव्हेरा दोन्हीही कुलिंग एजंट म्हणून काम करतात. त्यांच्या एकत्रित उपयोगाने टॅनिंग कमी होतं.
२. जर पिगमेंटेशन वाढले असतील तर ज्येष्ठमधाची पावडर आणि बटाट्याचा रस हे दोन्ही एकत्र करून चेहऱ्याला लावून १५ मिनिटे ठेवा आणि नंतर चेहरा धुवून टाका. बटाट्याचा रस हा नॅचरल ब्लिचिंग एजंट असतो, तर ज्येष्ठमध त्वचेमधली उष्णता कमी करतो.
पोट साफ होण्यासाठी ३ साध्या- सोप्या टिप्स, सकाळी उठताच पोट साफ होऊन लगेच फ्रेश वाटेल
३. ज्येष्ठमधाची पावडर, मुलतानी माती आणि गुलाबाचं पाणी एकत्र करून हा लेप त्वचेला लावा. १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. हा उपाय केल्यास डार्क स्पॉट्स कमी होतात.
४. ॲक्ने वाढले असतील किंवा उष्णतेमुळे पिंपल्स येत असतील तर चंदन पावडर, ज्येष्ठमध पावडर एकत्र करा. त्यात थोडं दही घालून ते चेहऱ्याला लावा. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास त्वचेमध्ये खूप चांगला बदल दिसून येईल.
Web Summary : Licorice powder offers an Ayurvedic solution for skin issues like pigmentation, dark spots, and acne. Mix it with aloe vera for tanning, potato juice for pigmentation, or multani mitti for dark spots. For acne, combine with sandalwood and yogurt.
Web Summary : मुलेठी पाउडर पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स और मुंहासों जैसी त्वचा समस्याओं के लिए एक आयुर्वेदिक समाधान है। टैनिंग के लिए इसे एलोवेरा के साथ, पिगमेंटेशन के लिए आलू के रस के साथ या डार्क स्पॉट्स के लिए मुल्तानी मिट्टी के साथ मिलाएं। मुंहासों के लिए चंदन और दही के साथ मिलाएं।