आपली त्वचा सुंदर, नितळ आणि चांगली दिसावी असं प्रत्येकाला वाटतं.(Skin care tips) पण कामाच्या गडबडीत आपल्याला त्वचेकडे काही लक्ष देता येत नाही. ऑफिस, घरातील काम, मुलांचा अभ्यास, शाळा या सगळ्यात आपला दिवस संपून जातो.(Open pores treatment) पण आपल्याला स्वत:साठी काही वेळ काढता येत नाही. इतकंच नाही तर साधं आरशामध्ये पाहायलाही आपल्याला वेळ नसतो. त्यामुळे त्वचेची काळजी आपल्याला काही नीट अशी घेता येत नाही.(Open pores solution for oily skin)
अनेकदा त्वचेकडे लक्ष दिले नाही की पिंपल्स, डोळ्यांखाली काळी वर्तुळे, डाग, ओपन पोअर्स, सुरकुत्या वाढतात. ज्यामुळे कमी वयात देखील चेहरा खराब, म्हातारा किंवा थोराड दिसू लागतो.(How to reduce open pores naturally) असं आपल्या बाबतीतही झालं असेल. तर ही एक सोपी ट्रिक वापरुन पाहा.
मेकअपपूर्वी मलायका अरोरा करते ४ गोष्टी, वयाच्या पन्नाशीतही दिसते कमाल सुंदर- तिचं खास रुटीन पाहा
चेहऱ्यावर दिसणारे मोठे छिद्रे म्हणजे ओपन पोअर्स जे साधरणत: नाक, गाल, कपाळ आणि हनुवटीवर दिसतात. हे छिद्र त्वचेतील तेल आणि घाम काढून टाकण्याचे काम करतात. पण जेव्हा हे अधिक प्रमाणात वाढतात तेव्हा त्वचा खडबडी आणि अधिक तेलकट दिसू लागते. ओपन पोअर्सची समस्या टाळण्यासाठी काय करायला हवं पाहूया.
ओपन पोअर्स हे जास्त तेलकट त्वचा, वृद्धत्वाची समस्या, जास्त मेकअप, ऊन, चेहऱ्याच्या स्वच्छतेकडे लक्ष न देणे किंवा अनुवंशिकता ही देखील कारणं असू शकतात. हे मुरुम, ब्लॅकहेड्स आणि ब्रेकआउट्ससारख्या समस्यांमुळे होऊ शकतात. यासाठी महागडे उत्पादने वापरण्याची गरज नाही.
सगळ्यात आधी फेश वॉश करण्याची गरज आहे. त्यानंतर फेस वॉश केल्यानंतर टोनर म्हणून आपण ग्रीन टी चा वापर करु शकतो. हा टोनर आपल्याला ३ ते ४ आठवडे सतत वापरायला हवी. ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, कॅटेचिन आणि पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. यामुळे त्वचेचा पोत सुधारण्यासाठी, त्वचेला एक्सफोलिएट करते तसेच छिद्र घट्ट करते. खाज कमी करुन त्वचेला मॉइश्चरायझ करते.
टोनर बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी अर्धा कर गरम पाणी करुन त्यात ग्रीन टीच्या २ बॅग्स घालाव्या लागतील. १० मिनिटे हा तशाच ठेवा. त्यानंतर भांड्यात पाणी घाला. आणि मिश्रणात गुलाबजल मिसळा. हे मिश्रण एका स्प्रेच्या बाटतील भरुन फ्रीजमध्ये ठेवा. हा टोनर दररोज चेहरा धुतल्यानंतर स्प्रे करा. आपण हे कापसाच्या मदतीने चेहऱ्याला लावू शकता. हे टोनर १० दिवसांपेक्षा जास्त काळ वापरु नका.