चेहरा आधीपेक्षा जास्त फुगलेला दिसतो, डबल चिन दिसते तर कधी चेहरा सुजलेला वाटतो अशी तक्रार बऱ्याचजणांची असते. तुम्हालाही असं वाटत असेल तर चिंता करू नका. चेहऱ्यावर एक्स्ट्रा फॅट जमा होणं खूपच कॉमन आहे (4 Easy Ways To Loose Fecial Fat). अन्हेल्दी लाईफस्टाईल, हॉर्मोनल चेंजेस किंवा वॉटर रिटेंशन यामुळे चेहरा खराब होऊ लागतो. रोजच्या जगण्यता काही गोष्टी फॉलो केल्या आणि स्वत:मध्ये बदल केले तर चेहरा शार्प, पातळ आणि जास्त एक्ट्रॅक्टिव्ह दिसण्यास मदत होईल. (How To Reduce Fecial Fat)
चेहऱ्याची चरबी कशी कमी करायची?
व्हिएलसीसी.कॉमच्या रिपोर्टनुसार तुमचा आहार तब्येत आणि चेहऱ्यालाही प्रभावित करतो. तुम्हाला चेहऱ्यावरची चरबी कमी करायची असेल तर तुम्ही खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सुधारणा करायला हवी. प्रोसेस्ड आणि पॅकेज्ड फूड कमी खा कारण यात अतिरिक्त सोडीयम आणि प्रिजर्व्हेटिव्ह असतात ज्यामुळे शरीरातील पाणी रोखलं जातं आणि सूज येते. आहारात हिरव्या भाज्या, फळं, प्रोटीनयुक्त आहार हेल्दी फॅट्सचा समावेश करा. यामुळे मेटाबॉलिझ्म वाढतो आणि चेहऱ्याची चरबी कमी होते.
पाणी योग्य प्रमाणात प्या
शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी जास्तीत जास्त प्या. ज्यामुळे चेहऱ्याची चरबी कमी होण्यास मदत होते. रोज कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी प्या.ला हवं. ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.
मीठ आणि साखर कमी खा
जास्त मीठ आणि साखर खाल्ल्यानं शरीरात पाणी रोखून धरण्याची समस्या उद्भवते. ज्यामुळे चेहरा सुजलेलं दिसतो. म्हणून प्रोसेस्ड फूड खाऊ नका, साखरेऐवजी मधाचा आहारात समावेश करा. साध्या मिठाऐवजी सैंधव मीठ किंवा हिमालयीन मीठ वापरा.
चेहऱ्याची मसाज करा
जर तुम्हाला चेहऱ्यावर नॅच्युरल ग्लो किंवा टाईटनेस हवा असेल तर चेहऱ्याची मसाज करायला हववी. ग्रीन टी नं फेस मसाज केल्यानं चेहर्याची सूज कमी होते. बर्फाच्या तुकड्यांनी मसाज केल्यास चेहरा टाईट होन पफीनेस कमी होतो. एलोवेरा जेलनं मसाज केल्यास त्वचा हेल्दी आणि टाईट राहण्यासही मदत होते.
