सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत झोपेची कमतरता, सतत मोबाइल-लॅपटॉपचा वापर, ताणतणाव आणि चुकीचा आहार याचा थेट परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो. डोळ्यांखाली असणारी काळी वर्तुळे ही केवळ सौंदर्याचाच नाही तर आरोग्याचे देखील नुकसान करतात. (dark circles home remedies) डोळ्यांखाली काळी वर्तुळे असली की अनेकजण महागड्या आय-क्रीम्स, सीरम्स वापरतात. पण तरी देखील आपल्याला अपेक्षित असा फरक काही दिसत नाही. (natural remedies for dark circles)
चेहरा कितीही सुंदर असला तरी डोळ्यांखाली असणारी काळी वर्तुळे संपूर्ण सौंदर्य खराब करतात. (grandma remedies for dark circles) पण आपल्या घरात, विशेषतः आपल्या आजीच्या बटव्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या डार्क सर्कल्सवर अत्यंत प्रभावी ठरतात. चला तर मग जाणून घेऊया, कोणते आहेत ते ३ घरगुती उपाय जे तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य पुन्हा मिळवून देतील.
1. डोळ्यांखालील काळे वर्तुळे घालवण्यासाठी आपण ज्येष्ठमधाचा वापर करु शकतो. याची पावडर पाण्यात विरघळून डार्क सर्कल असणाऱ्या ठिकाणी लावा. यात असणारे घटक डोळ्यांना थंड करण्यास मदत करते. ज्यामुळे काळी वर्तुळे कमी होतात. तसेच मेलेनिनचे उत्पादन कमी होते, यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते.
2. डार्क सर्कल घालवण्यासाठी आपण बदामाच्या तेलाचा देखील उपयोग करु शकतो. हे तेल काळ्या वर्तुळांवर लावल्यास आपल्या त्वचेला आतून पोषण मिळतं. बदामाचे तेल व्हिटॅमिन ई ने समृद्ध आहे. जे त्वचेतील अडथळा दुरुस्त करण्यास मदत करते.
3. गुलाबाच्या तेलाला रोझहिप ऑइल असं देखील म्हटलं जातं. आपण पिग्मेंटेशन आणि कोलेजनच्या समस्या टाळायच्या असतील तर गुलाबच्या तेलाचा वापर करु शकतो. हे तेल त्वचेला नैसर्गिक चमक देते. या उपायांसोबतच पुरेशी झोप, भरपूर पाणी प्या आणि संतुलित आहारही तितकाच महत्त्वाचा आहे. रोज किमान ७–८ तास झोप घेतली, स्क्रीन टाइम कमी केला आणि फळ-भाज्यांचा समावेश केला तर डोळ्यांखालची काळी वर्तुळे लवकर आटोक्यात येतात.
