Join us
Daily Top 2Weekly Top 5

थ्रेडिंग-वॅक्सिंग केल्यानंतर चेहऱ्यावर दाणे- लाल चट्टे येतात? 'हा' पांढरा पदार्थ करेल जादू, पिंपल्स-ओपन पोर्स, जळजळ होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2026 16:41 IST

Red bumps and rashes after face waxing home remedies : Best way to close open pores after threading: आपण वॅक्सिंग किंवा थ्रेडिंग केल्यानंतर चेहऱ्याला हा पांढरा पदार्थ लावल्यास आराम मिळेल.

हनुवटी किंवा चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढण्यासाठी आजकाल थ्रेडिंग किंवा फेस वॅक्सिंगचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. यामुळे त्वचा गुळगुळीत आणि स्वच्छ दिसते खरी, पण अनेकांसाठी हा अनुभव नंतर वेदनादायी ठरतो.(How to get rid of red spots after threading eyebrows) वॅक्सिंग किंवा थ्रेडिंग केल्यानंतर काही तासांतच चेहऱ्यावर बारीक- बारीक लाल दाणे येणे, त्वचा लाल होणे, रॅशेस किंवा जळजळ होणे यांसारख्या समस्या सुरु होतात. आपली त्वचा अतिसंवेदनशील असेल तर आपल्याला या त्रासाला सामोरे जावे लागते. बाजारात मिळणारी महागडी लोशन्स किंवा क्रीम्स बऱ्याचदा तात्पुरता आराम देतात, पण यातील केमिकल्समुळे त्वचा अधिकच खराब होण्याची भीती असते.(Alum for skin tightening and pore minimizing)
थ्रेडिंग आणि वॅक्सिंग करताना केसांच्या मुळांवर अचानक ताण पडतो. यामुळे त्वचेची छिद्रे मोठी होतात आणि तिथे बॅक्टेरियाचा संसर्ग सहज होतो.(How to use fitkari after upper lip threading) यामुळे त्वचेवर लहान पुरळ किंवा पिंपल्स येतात. पण यावर आपण स्वयंपाकघरात मिळणारा स्वस्त, नैसर्गिक आणि जादुई उपाय करु शकतो. जर आपण वॅक्सिंग किंवा थ्रेडिंग केल्यानंतर तुरटीचा वापर योग्य पद्धतीने केल्यास पिंपल्स, ओपन पोर्स कमी होतील. तसेच आग आणि जळजळही होणार नाही. 

A, B की C, परफेक्ट ब्रा साईज माहिती नाही? सोपी ट्रिक- सेकंदात ओळखा तुमची परफेक्ट ब्रा साईज

तुरटी वापरण्याची योग्य पद्धत 

1. थ्रेडिंग आणि वॅक्सिंग केल्यानंतर चेहरा आधी साध्या गार पाण्याने स्वच्छ धुवा. ज्यामुळे त्याच्यावरील अतिरिक्त वॅक्स किंवा धाग्यामुळे साचलेली घाण निघून जाईल. वॅक्स केल्यानंतर चेहऱ्यावर जळजळ होत असेल तर तुरटीचा लहान खडा घेऊन थंड पाण्यात बुडवून ओला करा. हा खडा चेहऱ्यावर हलक्या हाताने गोलाकार पद्धतीने फिरवा. तुरटी फिरवल्यानंतर २ ते ३ मिनिटे चेहरा सुकू द्या. सुरुवातीला थोडी आग आणि चुरचुर होईल. त्यानंतर गार पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा आणि हलक्या हाताने पुसा. 

2. चेहरा धुतल्यानंतर त्यावर शुद्ध कोरफडीचा गर किंवा मॉइश्चरायझर लावा. यामुळे त्वचेला थंडावा मिळेल. वॅक्स केल्यामुळे त्वचेची छिद्रो ओपन होतात. अशावेळी तुरटी नैसर्गिकरित्या काम करते. तुरटीचा वापर केल्यास त्वचा सैल पडत नाही. 

3. ओपन पोर्समध्ये धूळ आणि बॅक्टेरिया गेल्यामुळे पुरळ येतात. तुरटीमधील अँटी-सेप्टिक गुणधर्म बॅक्टेरियांना नष्ट करतात, ज्यामुळे वॅक्सिंगनंतर येणारे पिंपल्स कमी होतात. थ्रेडिंगमुळे त्वचेची आग आणि जळजळ होते. चेहऱ्यावरील तो भाग लाल होतो अशावेळी तुरटी लावल्यास त्वचा शांत होते. 

4. त्वचेची खूप आग होत असल्यात गुलाब पाणी आणि बर्फाचे खडे देखील आपण थ्रेडिंग किंवा वॅक्स केलेल्या जागी फिरवू शकतो. ज्यामुळे आपल्याला आराम मिळेल. 
 

English
हिंदी सारांश
Web Title : Alum: A magical remedy for skin irritation after threading/waxing.

Web Summary : Threading/waxing causes redness, irritation, and pimples. Alum, a readily available ingredient, can reduce inflammation, open pores, and prevent pimples. Apply alum solution after cleaning the face, followed by aloe vera or moisturizer.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी