तुम्हीसुद्धा गळणाऱ्या केसांपासून हैराण आहात आणि महागडी उत्पादनं वापरूनही तुम्हाला फरक पडत नसेल तर तुम्ही काही सोपे उपाय करून केसांचे गळणं थांबवू शकता (Hair Care Tips). आहारतज्ज्ञ श्वेता पांचाळ यांनी १ प्रभावी उपाय सांगितला आहे. हा उपाय केल्यांन केसांचं गळणं थांबेल. आवळ्याचा वापर करून तुम्ही हा उपाय करू शकता. आवळ्यात लवंग घालून केसांची काळजी घेऊ शकता. यासाठी नैसर्गिक वस्तूंचा वापर करा. ज्यामुळे केस मजबूत होतील आणि केसांचं गळणं थांबवण्यासही मदत होईल. केसांसाठी फायदेशीर तेल कसं तयार करायचं समजून घेऊ. (How To Prevent Hair Fall With Amla And Clove Oil By Dietitian Shweta Panchal)
आवळा आणि लवंग केसांसाठी कितपत फायदेशीर
केसांना काळेभोर बनवण्यासाठी तसंच स्काल्प स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही आवळ्याचा वेगवेगळ्या पद्धतीनं उपयोग करू शकता. ज्यामुळे केसांच्या समस्या दूर होतील. यात मोठ्या प्रमाणात व्हिटामीन सी, एंटीऑक्सिडेंट्स असतात जे मेलेनिन प्रोडक्शन वाढवतात आणि केसांची वाढ चांगली होते. पांढरे केस होत नाहीत. एंटी हेअर फॉल ऑईल बनवण्याची सोपी पद्धत पाहूया.
सगळ्यात आधी एक कढईत गरम करून घ्या. त्यात २ वाटी नारळाचं तेल गरम करून घ्या. तेव्हा आवळे त्यात घाला. नंतर हा आवळा कढईत ठेवून नारळाच्या तेलात घाला नंतर यात मेथीचे दाणे आणि बदाम घालून व्यवस्थित शिजू द्या. जेव्हा तेल हलकं गोल्डन किंवा पिवळं होईल तेव्हा गॅस बंद करा. नंतर एका बॉटलमध्ये किंवा काचेच्या जारमध्ये तेल घालून ते साठवून ठेवा. हे एंटी हेअर फॉल ऑईल तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा लावू शकता ज्यामुळे गळणारे केस कमी होतील.
हे तेल बनवण्यासाठी आवला, नारळाचं तेल, मेथीचे दाणे, बदाम या साहित्यांचा वापर करा. हे सर्व साहित्य तुमच्या केसांना हेल्दी बनवते ज्यामुळे केसांना भरपूर फायदे मिळतात. केसांवर मेथीचा वापर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं करू शकता. हेअर मास्क किंवा हेअर पॅकच्या स्वरूपात तुम्ही याचा वापर करू शकता. ज्यामुळे केसांची वाढ चांगली होईल.