Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > नॅचरल आणि चमकदार त्वचा देतं कोलेजन जेल, पाहा घरीच कसं तयार कराल आणि काय मिळतात फायदे

नॅचरल आणि चमकदार त्वचा देतं कोलेजन जेल, पाहा घरीच कसं तयार कराल आणि काय मिळतात फायदे

Natural Collagen : कोलेजन हे आपल्या शरीरात आढळणारं एक महत्त्वाचं प्रोटीन आहे, जे त्वचा, हाडे, स्नायू, सांधे आणि केस यांच्या रचनेला मजबूत ठेवण्याचं काम करतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 11:12 IST2026-03-28T11:06:48+5:302026-03-28T11:12:41+5:30

Natural Collagen : कोलेजन हे आपल्या शरीरात आढळणारं एक महत्त्वाचं प्रोटीन आहे, जे त्वचा, हाडे, स्नायू, सांधे आणि केस यांच्या रचनेला मजबूत ठेवण्याचं काम करतं.

How to naturally boost your collagen | नॅचरल आणि चमकदार त्वचा देतं कोलेजन जेल, पाहा घरीच कसं तयार कराल आणि काय मिळतात फायदे

नॅचरल आणि चमकदार त्वचा देतं कोलेजन जेल, पाहा घरीच कसं तयार कराल आणि काय मिळतात फायदे

Natural Collagen : मार्केटमध्ये मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रॉडक्टमध्ये केमिकल आणि भेसळीचं प्रमाण भरपूर असतं. यापासून ब्युटी प्रॉडक्ट्स सु्द्धा सुटलेले नाहीत. या प्रॉडक्ट्समुळे अनेकदा फायदे मिळण्याऐवजी त्वचेचं नुकसानच अधिक होतं. त्यामुळे अनेक स्किन एक्सपर्ट घरगुती उपाय वापरण्याचा सल्ला देत असतात. या उपायांनी त्वचेला हळूहळू पोषण मिळतं आणि त्वचा हेल्दी, सॉफ्ट आणि चमकदार होते. असाच एक घरगुती उपाय म्हणजे कोलेजन जेल. याने काय फायदे मिळतात, कोलेजन काय आहे हे समजून घेऊया.

कोलेजन काय आहे?

कोलेजन हे आपल्या शरीरात आढळणारं एक महत्त्वाचं प्रोटीन आहे, जे त्वचा, हाडे, स्नायू, सांधे आणि केस यांच्या रचनेला मजबूत ठेवण्याचं काम करतं. पण जर हे कमी झालं तर त्वचेसंबंधी, केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. अशात जर कोलेजन जेल घरीच तयार करून वापरलं तर फायदा अधिक मिळू शकतो. 

घरीच कसं बनवाल कोलेजन जेल? 

कोलेजन जेल जर घरीच बनवायचं असेल फार जास्त काही गोष्टी लागत नाहीत. काही नॅचरल गोष्टी जसे की, लवंगाचं पाणी, अॅलोव्हेरा जेल, अळशीचं जेल, मध, गुलाबजल, व्हिटामिन ई आणि बदामाचं तेल इत्यादी गोष्टी लागतील. या सगळ्याच गोष्टी त्वचेसाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. अॅलोव्हेराने त्वचेला थंडावा आणि हायड्रेशन मिळतं. तेच अळशीमुळे त्वचा टाइट होते आणि लवचिकताही वाढते. तर मधाने त्वचा मॉइश्चराइज होते आणि गुलाबजलाने त्वचा तजेलदार राहते.

कसं तयार कराल?

हे खास जेल तयार करण्यासाठी अळशीच्या बिया उकडून त्यांचा जेल तयार करा. मग त्यात थोडं अॅलोव्हेरा घाला. नंतर त्यात थोडे लवंगाच्या पाण्याचे थेंब, एक चमचा गुलाबजल, थोडं मध, एक व्हिटामिन ई कॅप्सूलचं तेल आणि त्यात काही थेंब बदामाचं तेल घालून चांगलं मिक्स करा. आपलं नॅचरल कोलेजन जेल तयार आहे.

कसा वापरावा?

रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा

थोडा जेल घेऊन हलक्या हाताने मसाज करा

आठवड्यातून 2–3 वेळा वापरा

Web Title : घर पर कोलेजन जेल: प्राकृतिक चमक, बनाने की विधि और फायदे जानें।

Web Summary : एलोवेरा, अलसी, लौंग का पानी और शहद जैसे प्राकृतिक तत्वों से घर पर कोलेजन जेल बनाना सीखें। यह उपाय त्वचा को स्वस्थ, मुलायम और चमकदार बनाता है, और कठोर रसायनों से बचाता है।

Web Title : Homemade collagen gel: Natural skin radiance, preparation, and benefits revealed.

Web Summary : Discover how to make collagen gel at home using natural ingredients like aloe vera, flaxseed, clove water, and honey. This DIY remedy promises healthier, softer, and more radiant skin with regular use, avoiding harsh chemicals.