वातावरणातील बदलांमुळे चेहऱ्यावर डाग, पिंपल्स तसंच काळपटपणा येतो. ऋतू बदलाचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो. थंडीच्या दिवसांत टॅनिंग, डाग पडणं, त्वचा डल दिसण अशा समस्या उद्भवतात. जर तुम्हालाही या वातावरणात महागडी उत्पादनं न वापरता आपल्या त्वचेची काळजी घ्यायची असेल तर तुम्ही घरगुती उटणं लावू शकता. हे उटणं तुमच्या त्वचेसाठी कमालीच ठरेल कारण यामुळे कोणत्याही साईट इफेक्ट्सशिवाय तुमचा चेहरा उजळण्यास मदत होईल. (How To Make Ubtan For Fair And Glowing Skin At Home Easily)
धूळ, मातीमुळे चेहऱ्याचे पोर्स बंद होतात. ज्यामुळे पिंपल्स, ब्लॅकहेड्स येतात. अशा स्थितीत काही नैसर्गिक उपाय तुमच्या त्वचेला पोषण देऊ शकतात. काही नॅच्युरल उपाय तुमच्या त्वचेला आतून पोषण देतील. हे उटणं तयार करण्यासाठी तुम्हाला घरात उपलब्ध असलेले काही पदार्थ लागतील. २ चमचे बेसन पीठ, १ चिमूटभर हळद, २ चमचे दही, बटाट्याचा रस हे साहित्य पुरेसं आहे.
घरगुती फेस पॅक कसा तयार करावा?
हे सर्व पदार्थ एका वाटीत घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या आणि घट्ट पेस्ट तयार करा. सगळ्यात आधी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. नंतर तयार उटणं चेहरा आणि मानेला व्यवस्थित लावा. १५ ते २० मिनिटं लावून सुकू द्या. सुकल्यानंतर हलक्या हातानं मसाज करत साध्या पाण्यानं चेहरा धुवा. आठवड्यातून २ वेळा हा उपाय केल्यास चांगला परिणाम दिसून येईल.
बेसनाचं उटणं लावण्याचे फायदे
बेसन त्वचेतील जास्तीचं तेल काढून डेड स्किन सेल्स काढण्यास मदत होते. याशिवाय हळदीतील एंटी बॅक्टेरियल गुण पिंपल्स आणि डाग काढून टाकण्यास मदत करता. दही त्वचेला मॉईश्चराईज ठेवते आणि त्वचेचा ग्लो वाढवते. बटाट्याचा रस टॅनिंग कमी करतो आणि स्किन टोन ब्राईट बनवण्यास मदत करतो. याशिवाय आठवड्यातून २ ते ३ वेळा चेहर्यावर वाफ घ्या. सोशल मीडिया ट्रेंड्स पाहून स्किनवर चुकीची उत्पादनं वापरू नका, बाहेर उन्हात जाताना सनस्क्रीन लावायला विसरू नका.
