Can we make cream from ghee : चेहऱ्यावर नॅचरल चमक हवी असेल, चेहऱ्यावरील डाग कमी करायचे असतील तर महिला आणि तरूणी नेहमीच वेगवेगळे क्रीम वापरतात. पण बाजारातून आणलेल्या या क्रीमसाठी पैसेही जास्त मोजावे लागतात. म्हणजे दर महिन्याचा हा खर्च फिक्स असतो. पण जर आपल्याला नॅचरल चमकवायचा असेल आणि डागही दूर करायचे असतील एक बेस्ट घरगुती उपाय आहे. बाजारातून महागडे क्रीम आणण्यापेक्षा आपण घरीच १ चमचा तूप वापरून नॅचरल क्रीम तयार करू शकता. या क्रीमने आपल्या चेहऱ्यावर महागड्या क्रीमपेक्षाही चांगली चमक येईल. अशात जाणून घेऊ तुपाचं क्रीम कसं तयार करायचं, कसं वापरायचं आणि त्यापासून मिळणारे फायदे....
तुपापासून क्रीम तयार करण्यासाठीचं साहित्य
एक चमचा तूप
एक चमचा अॅलोव्हेरा जेल
अर्धा चमका खोबऱ्याचं तेल
एक चमचा गुलाबजल
कसं तयार कराल?
तुपाचं क्रीम तयार करण्यासाठी एक प्लेट घ्या. त्यात तूप, अॅलोव्हेरा जेल, खोबऱ्याचं तेल आणि गुलाबजल टाका. या सगळ्या गोष्टी वाटीच्या मदतीने गोल फिरवा. ही प्रक्रिया तोपर्यंत करा जोपर्यंत पांढऱ्या रंगाचं क्रीम दिसू लागेल. तयार झालेलं क्रीम एक डब्यात टाकून फ्रीजमध्ये स्टोर करा. जशी गरज पडेल तसं हे क्रीम आपण वापरू शकता.
त्वचेसाठी फायदेशीर तूप
चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी तुपाचा वापर फार आधीपासून केला जातो. याने नॅचरल पद्धतीने त्वचा मॉइश्चराइज होते. तसेच तुपाने ड्राय स्किन हायड्रेट होते. सोबतच त्वचेवरील डेड स्किन सेल्सही दूर होतात.
नियमितपणे जर तुपाचं हे क्रीम आपण चेहऱ्यावर लावाल तर सुरकुत्या कमी होण्यासही मदत मिळते. तूप एका अँटी-एंजटसारखं काम करतं, जे चेहऱ्यावरील सुरकुत्या गायब करतं. सोबतच फाइन लाईन्सही कमी होतात.
कसं वापराल?
तुपाचं हे क्रीम आपण रोज चेहऱ्यावर लावू शकता. पण जर आपली त्वचा जास्त तेलकट असेल तर याचा वापर करू नका. सामान्य किंवा कोरड्या त्वचेवर याचा वापर करावा. या क्रीमने चेहऱ्यावर नॅचरल चमक येते. सोबतच त्वचा हायड्रेट देखील होते.
