Lokmat Sakhi >Beauty > आंबा खाऊन कोय फेकू नका! करा आंब्याच्या कोयीचे बॉडी बटर - उन्हाळ्यातला उत्तम उपचार...

आंबा खाऊन कोय फेकू नका! करा आंब्याच्या कोयीचे बॉडी बटर - उन्हाळ्यातला उत्तम उपचार...

Mango Seed Butter : Homemade Mango Butter For Skin : Only 3 Ingredients Mango Body Butter : How to make mango butter for your skin at home : रणरणत्या उन्हाळ्यात त्वचेची होणारी जळजळ, रॅशेज आणि इतर स्किन प्रॉब्लेम्सवर आंब्याची कोय म्हणजे वरदान...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2025 11:11 IST2025-05-05T11:00:40+5:302025-05-05T11:11:01+5:30

Mango Seed Butter : Homemade Mango Butter For Skin : Only 3 Ingredients Mango Body Butter : How to make mango butter for your skin at home : रणरणत्या उन्हाळ्यात त्वचेची होणारी जळजळ, रॅशेज आणि इतर स्किन प्रॉब्लेम्सवर आंब्याची कोय म्हणजे वरदान...

How to make mango butter for your skin at home Mango Seed Butter Homemade Mango Butter For Skin Only 3 Ingredients Mango Body Butter | आंबा खाऊन कोय फेकू नका! करा आंब्याच्या कोयीचे बॉडी बटर - उन्हाळ्यातला उत्तम उपचार...

आंबा खाऊन कोय फेकू नका! करा आंब्याच्या कोयीचे बॉडी बटर - उन्हाळ्यातला उत्तम उपचार...

उन्हाळा म्हटलं की येतो तो पिवळ्याधम्मक आंब्याचा सिझन. या ऋतूंत आपण अगदी मनसोक्त पोटभर आंबे खातो. आंबा खाऊन शक्यतो आपण आंब्याची कोय निरुपयोगी (Mango Seed Butter) समजून चक्क कचऱ्यात फेकून देतो. परंतु आंब्याप्रमाणेच आंब्याच्या कोयीत अनेक औषधी गुणधर्म असतात. आंब्याची कोय (Only 3 Ingredients Mango Body Butter) आपल्या आरोग्याप्रमाणेच त्वचेचे सौंदर्य (Homemade Mango Butter For Skin) राखण्यास देखील तितकीच फायदेशीर ठरते(How to make mango butter for your skin at home).

त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण अनेक महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स अगदी दररोज वापरतो. या कडाक्याच्या उन्हाळ्यात त्वचेची आर्द्रता व ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आपण मॉइश्चरायझर किंवा बॉडी बटर त्वचेला लावतो. परंतु त्वचेसाठी महागडे आणि केमिकल्सयुक्त मॉइश्चरायझर किंवा बॉडी बटर लावण्यापेक्षा आपण आंब्याच्या कोयीचे बॉडी बटर घरीच तयार करु शकतो. आंब्याची कोय फेकून न देता त्याचे नॅचरल बॉडी बटर कसे तयार करायचे ते पाहूयात. 

आंब्याची कोय आहे त्वचेसाठी गुणकारी... 

आंब्याच्या कोयीत अनेक औषधी गुण व फायदेशीर पोषकतत्वे असतात. आंब्याच्या कोयीत व्हिटामीन सी, व्हिटामीन ई, प्रोटीन, जिंक, पोटॅशियम, कॅल्शियम  मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. याच्या मदतीने आपण वेगवेगळ्या प्रकारच्या स्किन प्रोब्लेम्सपासून सुटका मिळव शकतो. उन्हाळ्यात स्किनची विशेष काळजी घेण्यासाठी आंब्याची कोय म्हणजे त्वचेसाठी वरदानच आहे. आंब्याची कोय अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल तत्वांनी युक्त असते. उन्हाळ्यात त्वचेला होणाऱ्या फंगल इंन्फेक्शनपासून बचाव होण्यास मदत होते. यासोबतच, उन्हाळ्यातही त्वचा हेल्दी राखण्यास मदत होते.  

एरंडेल तेल करेल जादू! पोटाच्या तक्रारीपासून - त्वचेपर्यंत अनेक समस्यांवर असरदार - तेल १ फायदे अनेक...

आंब्याच्या कोयीचे बॉडी बटर कसे तयार करायचे ? 

सगळ्यात आधी आंब्याच्या कोयीला लागलेला सगळा गर चमचा किंवा सुरीने खरवडून काढून घ्यावा. त्यानंतर, ही कोय कापून बरोबर त्याच्या आतील पांढऱ्या रंगाचे बी काढून घ्यावे. आता हे पांढऱ्या रंगाचे बी कापून किंवा किसणीवर किसून त्याचे लहान तुकडे किंवा किस करू घ्यावा. मग एका भांड्यात तयार शिया बटर आणि खोबरेल तेल दोन्ही समप्रमाणात घ्यावेत. गॅस मध्यम आचेवर ठेवून शिया बटर आणि खोबरेल तेल वितळवून घ्यावे. मग यात कापून घेतलेली कोय घालावी. आता ५ ते १० मिनिटे मिश्रण व्यवस्थित मंद आचेवर ठेवून उकळवून घ्यावे. त्यानंतर गॅस बंद करून मिश्रण थोडे थंड होऊ द्यावे. थंड झाल्यावर गाळणीने गाळून एका काचेच्या हवाबंद बरणीत स्टोअर करून ठेवावं. त्वचेला लावण्यासाठी घरगुती आंब्याच्या कोयीचे बॉडी बटर तयार आहे. 

ओपन पोर्समुळे चेहरा म्हातारा-उदास दिसतो? ७ नैसर्गिक पदार्थ लावा, चेहऱ्यावर येईल तरुण चमक...


खोबरेल तेलात मिसळा 'हा' पदार्थ आणि सनस्क्रीन तयार, नको महागडे सनस्क्रीन - होईल पैशांची बचत...

आंब्याच्या कोयीचे बॉडी बटर त्वचेसाठी का फायदेशीर आहे ? 

१.आंब्याच्या कोयीचे बॉडी बटर त्वचेला खोलवर हायड्रेट करते, ज्यामुळे त्वचा मऊ आणि गुळगुळीत होते. 

२. हे बॉडी बटर रणरणत्या उन्हांत देखील त्वचेचा नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा अधिक काळ हायड्रेटेड राहते.   

३. बॉडी बटर त्वचेवरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचेवरील एजिंगच्या खुणा कमी होण्यास मदत होते. 

४. बॉडी बटर नियमितपणे लावल्यास त्वचा निरोगी आणि चमकदार होते. 

५. उन्हाळ्यात त्वचेला शांत आणि जळजळ कमी करण्यासाठी हे बॉडी बटर खूप फायदेशीर ठरते.

Web Title: How to make mango butter for your skin at home Mango Seed Butter Homemade Mango Butter For Skin Only 3 Ingredients Mango Body Butter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.