Join us

जीवाभावाच्या माणसांसाठी आपल्या हातांनी तयार करा पारंपरिक उटणं, पद्धत सोपी -केमिकल फ्री दिवाळी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 17:48 IST

Homemade sugandhi Utane : आता बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे उटणे मिळतात. काहींमध्ये घातक केमिकल्स असतात. त्यामुळे आज आपण पाहूया, घरच्या घरी नैसर्गिक आणि सुगंधी उटणे कसं तयार करायचं.

Homemade sugandhi Utane :  दिवाळी म्हटली की रोषणाई, सजावट आणि फराळासोबत उटणे लावण्याचं विशेष महत्त्व असतं. पहाटे लवकर उठून उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आपल्याकडे अनेक वर्षांपासून सुरू आहे. आधी जास्तीत जास्त लोक हे उटणे घरीच तयार करत असत. मात्र आता बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे उटणे मिळतात. काहींमध्ये घातक केमिकल्स असतात. त्यामुळे आज आपण पाहूया, घरच्या घरी नैसर्गिक आणि सुगंधी उटणे कसं तयार करायचं.

उटणं म्हणजे काय?

उटणं हा अगरू (एक सुगंधी झाड), चंदन, कस्तुरी, केशर यांसारख्या सुगंधी आणि औषधी पदार्थांपासून बनवलेला लेप असतो. हे अंगाला लावल्याने शरीर स्वच्छ होतं, त्वचा उजळते आणि शरीराला मंद सुगंध येतो.

आजकाल उटणे बनवताना कापूरकाचऱ्या, बावची, गुलाबाच्या पाकळ्या, वाळ्याची मुळे, हळद, अर्जुन वृक्षाची साल इत्यादी घटक वापरले जातात. हे उटणं दूधात भिजवून त्यात थोडं तिळाचं तेल घालतात आणि मग अंगाला लावतात. वाळण्यापूर्वी हलक्या हाताने घासून काढल्यास त्वचा मऊ आणि स्वच्छ होते.

उटणं लावण्याचे फायदे

त्वचा कोरडी पडत नाही

उटणात असलेली आंबेहळद आणि तिळाचं तेल त्वचा मऊ ठेवतात आणि नैसर्गिक ओलावा टिकवतात.

त्वचा उजळते

मसूर डाळ त्वचेवरील मृत पेशी काढून टाकते आणि चेहऱ्याची कांती उजळवते.

अंगावरील केस दूर होतात

उटणं घासून काढल्याने अंगावरील हलके केस निघतात आणि त्वचा गुळगुळीत होते.

सुगंध आणि ताजेपणा

वाळा, कापूर आणि गुलाबाचे घटक अंगास मंद सुगंध देतात, ज्यामुळे शरीर आणि मन ताजेतवाने राहते.

घरच्या घरी उटणं तयार करण्याची पद्धत

मसूर डाळ पीठ    110 ग्रॅमआवळकाठी    10 ग्रॅमसरीवा    10 ग्रॅमवाळा    10 ग्रॅमनागरमोथा    10 ग्रॅमजेष्ठमध    10 ग्रॅमसुगंधी कचोरा    10 ग्रॅमआंबेहळद    2 ग्रॅमतुलसी पावडर    10 ग्रॅममंजीष्टा    10 ग्रॅमकापूर     2 ग्रॅम

सर्व घटक मिक्सरमध्ये बारीक करून एअर टाईट डब्यात साठवा. उटणं वापरताना दुधात किंवा गुलाबपाण्यात भिजवून थोडं तिळाचं तेल घालून अंगाला लावा. चेहऱ्यावर उटणं खूप घासू नका, हलक्या हाताने लावा. लहान मुलांसाठी उटणात हळद, बेसन आणि दूध वापरल्यास अधिक सौम्य आणि सुरक्षित राहतं.

English
हिंदी सारांश
Web Title : Make Traditional Homemade Utane for Loved Ones: Easy, Chemical-Free Diwali!

Web Summary : Diwali calls for Utane! Make natural, fragrant Utane at home using ingredients like lentil flour, sandalwood, and turmeric. This traditional paste cleanses, brightens skin, and offers a pleasant fragrance. Avoid harsh chemicals and enjoy a pure, homemade Diwali.
टॅग्स :दिवाळी २०२५त्वचेची काळजीब्यूटी टिप्स