Home Remedy for Silky Smooth Hairs: मुलायम आणि सिल्की केस आपल्या सौंदर्यात भर घालत असतात. काही लोकांचे केस नॅचरलीच स्मूथ आणि सिल्की असतात. तर काही लोक यासाठी प्रॉडक्ट्सची मदत घेतात. पण याचा फायदा काही दिवसांसाठीच मिळतो. अशात केस स्मूथ आणि सिल्की करण्यासाठी केमिकल प्रॉडक्ट वापरण्याऐवजी काही नॅचरल घरगुती उपायही करू शकता. या उपायानी कोणते साइ़ड इफेक्टही होत नाहीत आणि जास्त पैसेही लागत नाहीत. आज आम्ही आपल्याला असा एक घरगुती उपाय सांगणार आहोत, जो करून आपण केस स्मूथ, सिल्की बनवू शकता. आयुर्वेद डॉक्टर शोभना यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
हेअरमास्क बनवण्यासाठी साहित्य
अळशीच्या बिया
मक्याचं पीठ
खोबऱ्याचं तेल
ऑलिव्ह ऑइल
कसा बनवाल हेअरमास्क?
हा हेअरमास्क तयार करणं फारच सोपं आहे. यासाठी एका पॅनमध्ये १ ग्लास पाणी टाकून ३ चमचे अळशीच्या बिया शिजवा. पाण्याचा रंग बदलेपर्यंत उकळा. नंतर हे पाणी गाळून घ्या. त्यानंतर त्यात २ चमचे मक्याचं पीठ १ ग्लास पाण्यात उकडा. याची मुलायम पेस्ट होऊ द्या. अळशीच्या बियांची जेल त्यात मिक्स करा. त्यात २ चमचे खोबऱ्याचं तेल घाला, १ चमचा ऑलिव्ह ऑइल घाला. हे मिश्रण चांगलं मिक्स करा. आपला हेअरमास्क तयार आहे.
डॉक्टर शोभना सांगतात की, हा हेअरमास्क नॅचरल कंडीशनरसारखा काम करतो. हा हेअरमास्क केसांना चांगल्याप्रकारे लावा आणि ४० मिनिटांनी वॉश करा. आठवड्यातून एकदा हा हेअरमास्क आपण केसांना लावू शकता. या हेअरमास्कने केस स्मूथ आणि सिल्की तर होतीलच, सोबतच केसगळती सुद्धा थांबेल. केसांची चांगली वाढही होईल. डॉक्टरांनी दावा केला आहे की, हा हेअरमास्क एकदा वापरल्यावरच आपल्याला चांगला परिणाम दिसून येईल.
