चेहरा चमकदार, तजेलदार दिसावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिम्स, लोशन, फेस पॅक लावतात पण याचा परिणाम दीर्घकाळ नसून काही वेळासाठीच असतो. एकदा त्वचा डल दिसायला लागली की कितीही प्रयत्न केले तरी चेहऱ्यावर हवातसा ग्लो येत नाही. (How To Make Desi Cleanser With Dahi And Besan)
त्वचेचा कोणताही रंग खराब किंवा चुकीचा नसतो. काही लोक आपल्या त्वचेचा रंग सुधारण्यासाठी चेहऱ्यावर वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर करतात. पण बेसिक चुका टाळल्या आणि घरगुती उत्पादनांचा वापर केला जर तुमच्या त्वचेचा रंग उजळण्यास मदत होईल. (How To Make Desi Cleanser With Dahi And Besan Dermatologist Doctor Rashmi Shetty Shared Easy Face Wash Recipe)
फेस वॉश का वापरावा?
फेस वॉशनं चेहरा धुतल्यानं धूळ, मातीची धर निघून जाण्यास मदत होते. यामुळे त्वचा एक्सफोलिएटही चांगली होते. तसंच तुम्ही स्किन केअरची सुरूवात करण्याआधी तोंड धुत असाल तर चेहरा आतून व्यवस्थित साफ होईल. अन्य प्रोडक्ट्स सहज त्वचेत एब्जॉर्ब होतात. फेस वॉशचा वापर करणं त्वचेच्या सौंदर्याच्या दृष्टीनं फार महत्वाचे आहे.
घरीच तयार करा फेस वॉश
जर तुम्हाला बाजारात जाऊन फेस वॉश विकत घेण्यात पैसे घालवायचे नसतील तर तुम्ही घरीच फेस वॉश बनवू शकता. त्यासाठी २ सोपे उपाय तुम्हाला करावे लागतील. एका पॉडकास्टमध्ये डर्मोटोलॉजिस्ट डॉक्टर रश्मी शेट्टींनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. त्यांनी २ सोपे उपाय सांगितले आहेत. घरच्याघरी हे उपाय केल्यास तुम्हाला तरूण, तजेलदार चेहरा मिळेल.
दही आणि बेसनाचा फेसवॉश
हा उपाय करण्यासाठी एका वाटीत थोडं बेसन घ्या. त्यात दही मिसळा. नंतर फेस वॉशऐवजी चेहऱ्यावर हलक्या हातानं रगडून घ्या. हे कॉम्बिनेशन त्वचेतील घाण साफ करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त टॅनिंग कमी होते त्वचा सॉफ्ट, ग्लोईंग बनण्यासही मदत होते.
मध आणि साखरेचा फेस वॉश
एका वाटीत मध घ्या. त्यात साखर मिसळून घ्या. हे कॉम्बिनेशन चेहऱ्याला हलक्या हातानं रगडून घ्या. ज्यामुळे त्वचेचं होणारं नुकसान टाळता येतं. ज्यामुळे डेड स्किन सेल्स निघून जातात. ओठ आणि चेहऱ्यासाठी नॅच्युरल स्क्रब प्रमाणे काम करते. यामुळे चेहऱ्यावर नॅच्युरल ग्लो येण्यास मदत होते.
