Join us

काखेतल्या काळपट डागांमुळे स्लिव्हजलेस ड्रेस घालणं टाळताय? ३ नैसर्गिक उपाय-दिसेल झ्टपट बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2024 18:02 IST

How to Lighten Underarms: Check out Natural Remedies : केमिकल उत्पादने सोडा, बटाटा-लिंबू-खोबरेल तेलाचा उपाय करून पाहा-काखेतील काळेपणा होईल दूर

काळी पडलेली काख अनेक जणींसाठी डोकेदुखी ठरते (Unlighten underarms). काळपट पडलेल्या काखेमुळे बऱ्याचदा आपण स्लिव्जलेस कपडे घालणं टाळतो. काखेतील काळेपणा ऐनवेळी काढणं कठीण आहे. पण उपाय म्हणून आपण काही गोष्टी करून पाहू शकता. बऱ्याचदा केमिकल रसायनयुक्त उत्पादनांमुळे काखेतील काळपटपणा वाढत जातो. ज्यामुळे बऱ्याचदा लाजिरवाणे देखील वाटते.

आपले अंडरआर्मस चारचौघात काळे पडल्याचे दिसले तर ते वाईट दिसते. केमिकल उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा आपण काही नैसर्गिक उत्पादनांचा देखील वापर करून पाहू शकता (Skin care Tips). या उपायांमुळे इजा न होता, काखेतील काळपटपणा दूर होईल, शिवाय आपण स्लिव्हजलेस ड्रेस बेफिकीर घालू शकता(How to Lighten Underarms: Check out Natural Remedies).

काखेतील काळेपणा घालवण्यासाठी नैसर्गिक उपाय

बटाटा

बऱ्याचदा हार्मोनल बदलावांमुळे काखेतील काळपटपणा वाढत जातो. आपण हा काळेपणा दूर करण्यासाठी बटाट्याचा वापर करू शकता. यासाठी बटाटा चिरून त्याचे २ भाग करा. बटाट्याचा एक तुकडा अंडरआर्म्सवर घासा. किंवा आपण काखेत बटाट्याचा रस देखील लावू शकता. काही वेळानंतर साबणाने जागा स्वच्छ करा. हा उपाय आपण आठवड्यातून २ किंवा ३ वेळा करू शकता.

उपाशीपोटी खा कढीपत्त्याची ४ पानं रोज, केस वाढतील आणि तारुण्यही वाढेल-पाहा उपाय

लिंबू

लिंबू हे एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते. जे त्वचेतील डाग घालवण्यासाठी मदत करते. आपण याच्या वापराने काखेतील काळेपणा देखील दूर करू शकता. यासाठी लिंबाचा तुकडा घेऊन काखेत घासा. यामुळे अंडरआर्म्सवरील काळपटपणा दूर होईल, शिवाय त्वचा क्लिन होईल.

खोबरेल तेलात मिसळा स्वयंपाकघरातल्या २ साध्याच गोष्टी, केस गळती विसराल कायमची, वाढतील केस

खोबरेल तेल

खोबरेल तेल फक्त केसांसाठी नसून, त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. काखेतील काळेपणा दूर करण्यासाठी आपण खोबरेल तेलाचा वापर करू शकता. खोबरेल तेलात व्हिटॅमिन ई असते. जी त्वचा उजळण्यास उपयुक्त ठरते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी