Lokmat Sakhi >Beauty > खोबरेल तेलात मिसळा स्वयंपाकघरातल्या २ साध्याच गोष्टी, केस गळती विसराल कायमची, वाढतील केस

खोबरेल तेलात मिसळा स्वयंपाकघरातल्या २ साध्याच गोष्टी, केस गळती विसराल कायमची, वाढतील केस

Apply Coconut Oil for Hair Growth at Home: It Works! : खोबरेल तेल-कढीपत्ता-मेथी दाणे, घरगुती अँटी हेअर फॉल ऑइलची जादू पाहा, घनदाट केसांचं सिक्रेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2024 05:00 PM2024-01-30T17:00:08+5:302024-01-30T17:01:09+5:30

Apply Coconut Oil for Hair Growth at Home: It Works! : खोबरेल तेल-कढीपत्ता-मेथी दाणे, घरगुती अँटी हेअर फॉल ऑइलची जादू पाहा, घनदाट केसांचं सिक्रेट

Apply Coconut Oil for Hair Growth at Home: It Works! | खोबरेल तेलात मिसळा स्वयंपाकघरातल्या २ साध्याच गोष्टी, केस गळती विसराल कायमची, वाढतील केस

खोबरेल तेलात मिसळा स्वयंपाकघरातल्या २ साध्याच गोष्टी, केस गळती विसराल कायमची, वाढतील केस

आजकाल प्रत्येक व्यक्ती केसांच्या समस्येने (Hair Problems) त्रस्त आहे. केसात कोंडा, केस गळणे, कमी वयात केस पांढरे यासह केसांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी आपण विविध उपाय करून पाहतो. महागडे सौंदर्य उत्पादने असोत किंवा ब्यूटी ट्रिटमेण्ट यामुळे केस आणखीन खराब होतात. त्यातील केमिकल रसायनांमुळे केसांचे प्रचंड नुकसान होते. यावर उपाय म्हणून आपण खोबरेल तेलाचा वापर करून पाहतो (Coconut Oil for Hair).

पण जर आपल्याला केसांच्या इतरही समस्या सोडवायच्या असतील तर, खोबरेल तेलात मेथी दाणे आणि कढीपत्ता घालून केसांना लावा (Hair Care Tips). मेथी दाणे आणि कढीपत्त्यातील गुणधर्म केसांच्या वाढीस मदत करतात, शिवाय आपले केस कधी गळत होते, हेही आपण विसरून जाल(Apply Coconut Oil for Hair Growth at Home: It Works!).

खोबरेल तेलात २ गोष्टी मिसळून घरीच करा अँटी हेअर फॉल ऑइल

सर्वप्रथम, गॅसवर पॅन ठेवा. त्यात एक कप खोबरेल तेल घाला. गॅस मध्यम आचेवर ठेवा. २ मिनिटानंतर त्यात २ चमचे मेथी दाणे आणि वाटीभर कढीपत्त्याची पानं घालून मिक्स करा. तेलाला उकळी आली की गॅस बंद करा. तेल थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. एका बॉटलवर चाळणी ठेवा, त्यावर तेल ओतून गाळून घ्या. अशा प्रकारे अँटी हेअर फॉल ऑइल वापरण्यासाठी रेडी. आपण या तेलाचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकतात.

बहुगुणी कढीपत्त्याची खमंग चटणी, केस-त्वचेच्या तक्रारी विसराल; सौंदर्यात पडेल भर

केसांवर अँटी हेअर फॉल ऑइल लावण्याचे फायदे

खोबरेल तेल

खोबरेल तेल, अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि फॅटी अॅसिड्सने समृद्ध आहे. नियमित केसांना खोबरेल तेल लावल्याने स्काल्पमधील ब्लड सर्क्युलेशन सुधारते. शिवाय केस मुळापासून मजबूत करण्यास मदत करते.

कढीपत्ता

कढीपत्ता फक्त फोडणीसाठी नसून केसांसाठीही फायदेशीर ठरते. कढीपत्त्यात व्हिटॅमिन सी, बी, प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. कढीपत्त्यामुळे टाळूच्या रक्ताभिसरणाला चालना मिळते. त्यामुळे कढीपत्ता आपल्या केसांच्या वाढीस फायदेशीर ठरते.

काळे डाग-डार्क सर्कलमुळे त्रस्त? दह्यात मिसळा २ गोष्टी; दिसाल सुंदर-काळी वर्तुळे झटक्यात गायब

मेथी दाणे

मेथीमध्ये असणारे प्रोटीन, विटामिन सी हे स्काल्प हेल्दी ठेऊन केस अधिक घनदाट करण्यास मदत करतात. याशिवाय मेथीच्या दाण्यात असणारे लोह स्काल्पमधील ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत करतात. ज्यामुळे केसांना मजबुती मिळते.

Web Title: Apply Coconut Oil for Hair Growth at Home: It Works!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.