हिवाळ्याच्या दिवसांत त्वचेबरोबरच केसांच्याही बऱ्याच समस्या उद्भवतात. केस कोरडे पडणं, कोंडा होणं, केस गळणं आणि केसांची चमक कमी होणं अशा समस्या उद्भवतात थंडीच्या दिवसांत हवेमुळे केसांचे नैसर्गिक मॉईश्चर कमी होते. अशावेळी केसांची काळजी नेमकी कशी घ्यावी असा प्रश्न अनेकांना पडतो (Which Oil Is Best For Winter). कोणतं तेल लावल्यानं केस मऊ राहण्यास मदत होते. याबाबत सौंदर्यतज्त्र शहनाज हुसैन यांनी अधिक माहिती दिली आहे. एक्सपर्ट्स नेमकं काय सांगतात समजून घेऊ. (How To Keep Hairs Healthy In Winter)
एक्सपर्ट्स काय सांगतात?
सौंदर्यतज्ज्ञ शहनाज हुसैन सांगतात की हिवाळ्याच्या दिवसांत वातावरण एकदम कोरडं असते. ज्यामुळे केसांचे नॅच्युरल ऑईलिंग कमी होते. याचा परिणाम केसांच्या मुळांवर होतो. जर वेळीच योग्य काळजी घेतली नाही तर केस कमकुवत होऊन तुटू लागतात.
मांडी घालून जेवावं असं का म्हणतात? ७ कारणं, नेहमी मांडी घालून जेवायला बसाल
शहनाज सांगतात की रोज केसांना तेल लावणं गरजेचं नाही पण आठवड्यातून कमीत कमी एकदा व्यवस्थित हेडमसाज करायला हवी. तेल लावल्यानंतर २ तास केस तसेच राहू द्या. जेणेकरून स्काल्पला व्यव्सथित पोषण मिळेल. २ तासांनी तुम्ही शॅम्पू लावून केस धुवू शकता. (Ref)
हिवाळ्यात केसांना कोणतं तेल लावावं?
ब्युटी एक्सपर्ट्स सांगतात की नेहमी हर्बल हेअर ऑईलची निवड करा. असं तेल ज्यात भृंगराज आणि ब्राम्ही यांसारखी तत्व असतील ज्यामुळे स्काल्प मजबूत राहील आणि केसांची चमक टिकून राहण्यासही मदत होईल. तेल लावल्यानंतर गरम टॉवेलनं ३० मिनिटं डोकं झाकून ठेवा. ज्यामुळे तेल केसांच्या मुळांत व्यवस्थित जातं आणि केसांना आतून पोषण मिळतं.
जेवणानंतर लगेच चालायला गेल्यानं वजन पटकन घटतं? पाहा कसं-किती चालावं..
शहनाज सांगतात की केस चांगले ठेवण्यासाठी गरम पाण्यानं केस धुणं टाळायला हवं. जर तुम्ही गरम पाण्यानं केस धुतले तर कोरडे आणि रुक्ष होऊ लागतात. हलक्या कोमट पाण्याचा वापर करा.ब्युटी एक्सपर्ट्स सांगतात की,जास्त केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर करणं टाळायला हवं. केसांवर जास्त स्टाईलिंग टुल्सचा वापर करू नका. संतुलित, व्यवस्थित आहार घ्या. योग्य तेल, योग्य खाण्यापिण्याच्या सवयींमुळे केस मजबूत आणि चमकदार राहण्यास मदत होते.
