Lokmat Sakhi >Beauty > स्काल्पला टक्कल दिसतंय? मोहोरीच्या तेलात हा पदार्थ घालून लावा, कंबरेपर्यंत लांब-दाट होतील केस

स्काल्पला टक्कल दिसतंय? मोहोरीच्या तेलात हा पदार्थ घालून लावा, कंबरेपर्यंत लांब-दाट होतील केस

How To Grow Hairs Faster, How to Avoid Hair Loss : मोहोरीचे तेल तुमच्या हेअर केअरसाठी फायदेशीर ठरू शकतं. (Apply Mustard Oil For Hair Fall Control)

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 17:04 IST2025-09-08T14:32:53+5:302025-09-08T17:04:59+5:30

How To Grow Hairs Faster, How to Avoid Hair Loss : मोहोरीचे तेल तुमच्या हेअर केअरसाठी फायदेशीर ठरू शकतं. (Apply Mustard Oil For Hair Fall Control)

How To Grow Hairs Faster : Hair Fall Control Tips Apply Mustard Oil For Hair Fall Control | स्काल्पला टक्कल दिसतंय? मोहोरीच्या तेलात हा पदार्थ घालून लावा, कंबरेपर्यंत लांब-दाट होतील केस

स्काल्पला टक्कल दिसतंय? मोहोरीच्या तेलात हा पदार्थ घालून लावा, कंबरेपर्यंत लांब-दाट होतील केस

आपले केस लांबसडक दाट असावेत असं प्रत्येकालाच वाटतं. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, खराब जीवनशैली, प्रदूषण, ताण-तणाव यामुळे केसांच्या बऱ्याच समस्या उद्भवतात (Hair Fall Control Tips). केसांना दाट बनवण्यासाठी महिला वेगवेगळ्या प्रकारच्या हेअर केअर उत्पादनांचा वापर करतात किंवा महागड्या हेअर ट्रिटमेंट्स घेतात. पण असं केल्यानं  केसाचं नुकसान होऊ शकतं. मोहोरीचे तेल तुमच्या हेअर केअरसाठी फायदेशीर ठरू शकतं. (Apply Mustard Oil For Hair Fall Control)

2016 मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार मोहोरीच्या तेलात  आयसोथायोसायनेट असते जे केसांच्या वाढीस उत्तेजन देते.मोहोरीच्या तेलातील ओमेगा-3 फॅटी एसिड्स केसांना पोषण देऊन केस गळती कमी करते. यात एंटी बॅक्टेरिअल, एंटी फंगल गुण असतात जे केसांच्या वाढीस उत्तेजन देतात (Ref). लांब केसांसाठी तुम्ही  मोहोरीचं तेल, मेथीचे दाणे या वस्तूंचा वापर करू शकता त्यासाठी 1 कढई घ्या त्यात तुम्ही मोहोरीचे तेलही गरम करू शकता. मेथीचे दाणे कढईत घालून व्यवस्थित गरम करून घ्या. तेलाचा रंग बदलेपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्या. तयार तेल थंड करून एका काचेच्या बरणीत गाळून घ्या. 1 तासासाठी केसांना लावून तसंच ठेवा. लवकरात लवकर तुम्हाला परीणाम दिसून येईल.

हे खास तेल केसांना लावण्याचे फायदे

केसांच्या वाढीसाठी मोहोरीचे तेल आणि मेथीचे दाणे मिसळून तेल बनवू शकता. काही महिन्यातच गुडघ्यापर्यंत लांब केस होतील.जर तुमचे केस खूपच गळत असतील तर हे तेल नियमित  केसांना लावा. नियमित या तेलाचा वापर केल्यानं केस दाट होतात आणि केस गळणं थांबण्यासही मदत होते. वेळेआधीच केस पांढरे होऊ लागले तर तुम्ही हे तेल लावू शकता.

दाट-सुंदर केसांसाठी दिशा पाटनीची आई घरीच बनवते हे खास तेल; किचनमधले २ पदार्थ-लांब केसांचं सिक्रेट

पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठीसुद्धा हे  तेल प्रभावी ठरते.आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा मोहोरीच्या तेलानं डोक्याला मसाज करा ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारेल आणि केस मजबूत राहतील.तेल कोमट करून लावल्यस केसांच्या मुळांमध्ये व्यवस्थित शोषले जाईल. चांगला रिजल्ट येण्यासाठी रात्रभर केसांमध्ये तेल राहू द्या.सकाळी सौम्य शाम्पूनं केस धुवा.


 

Web Title: How To Grow Hairs Faster : Hair Fall Control Tips Apply Mustard Oil For Hair Fall Control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.