Join us  

आयब्रोजचे केस विरळ-आकारही धड नाही? रात्री झोपताना 'हे' तेल लावा; दाट होतील भुवया

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 5:14 PM

How to Grow Eye Brow Hairs Faster : आयब्रोजचे केस दाट होण्यासाठी तुम्ही काही सोप उपाय करू शकता.

आयब्रो दाट आणि मोठ्या असतील तर चेहऱ्याचे सौंदर्यही खुलून येतं आणि तुम्ही आपल्या आवडीनुसार आयब्रोजना शेप देऊ शकता. (Best Home Remedies For Thick Eyebrows) पातळ आयब्रोज असतील तर चेहऱ्यावर आयब्रो पेन्सिलने आऊटलाईन्स काढावे लागतात. (Eye Brow's Hair Growth Tips) अशावेळी आयब्रोज पेन्सिलाचा वापर टाळण्यासाठी तुम्ही काही बेसिक उपाय  करू शकता. (How to Grow Eye Brow Hairs)

ज्यामुळे आयब्रोजच्या केसांची वाढ नैसर्गिकरित्या होण्यास मदत होईल.  डोक्यावरील केसांना  तेल लावल्याने केसांची वाढ व्यवस्थित होते. (Best Oil For Thin Eyebrows Rosemary Oil To Get Thick Hair) त्याचप्रमाणे आयब्रोजच्या केसांवरही काही प्रकारच्या तेलांचा वापर केला तर केसांची वाढ चांगली होण्यास मदत होते. आयब्रोजचे केस दाट होण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. (How to Grow Eyebrows Thicker At Home)

बी ब्युटीफूलच्या रिपोर्टनुसार आयब्रोजचे केस वाढवण्यासाठी बायोटीन रिच फुड्स म्हणजे सोयाबीन, नट्स, केळी हे पदार्थ खा, आहारात व्हिटामीन बी आणि डी युक्त पदार्थांचा समावेश करा. ऑरेंज ज्यूस, दूध, तूप अशा पदार्थांचा समावेश करा. आयब्रोजचे केस चांगले राहण्यासाठी आयब्रो सिरम किंवा घरगुती मास्कचा वापर करा. रात्री मेकअप काढल्याशिवाय झोपू नका. 

केस जास्तच पिकलेत? जास्वंदाच्या फुलाचा १ उपाय; डाय न लावता काळेभोर-दाट होतील केस

आयब्रोजचे केस दाट करण्यासाठी रोजमेरी ऑईल

रोजमेरी इसेंशियल तेलात एंटी ऑक्सिडेंट्स  जास्त प्रमाणात असतात. या तेलाने हेअर फॉलिकल्समध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगले राहण्यास मदत होते आणि केस दाट दिसू लागतात. या तेलाचा वापर करण्यासाठी रोजमेरी तेलाच्या काही थेंबात नारळाचे तेल किंवा बदामाचे तेल मिसळा. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आयब्रोजच्या केसांवर हे तेल लावा. रात्रभर तसंच ठेवल्यानंतर सकाळी उठल्यानंतर केस व्यवस्थित धुवून  घ्या. ज्यामुळे आयब्रोजचे केस दाट दिसतील. 

हा उपायही फायदेशीर ठरेल

१) कांद्याचा रस वापरून तुम्ही आयब्रोजच्या केसांना दाट बनवू शकता.  कांद्याचा रस काढून कापसाने भुवयांना लावा. २० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. ज्यामुळे केसांवर ग्लो येण्यास मदत होईल.

खूप मेहनत करूनही वजन कमी नाहीये? या आजारामुळे वजन घटवणं होतं कठीण-४ वेट लॉस टिप्स

2) एलोवेराची ताजी पानं घेऊन त्याचा गर आयब्रोजवर लावा. ज्यामुळे केस दाट होतील. एलोवेरातील  एलोनिनमुळे आयब्रोज केस चमकण्यास होण्यास मदत होईल.

३) आयब्रोजच्या केसांना दाट बनवण्याासाठी सगळ्यात आधी लिंबाचा रस कापून अर्धा करा. आयब्रोजवर ५ मिनिटं लावून ठेवा. लिंबाराच्या रसात नारळाचे तेल मिसळून लावा. यात व्हिटामीन बी, व्हिटामीन सी आणि फॉलिक एसिड यात असते ज्यामुळे आयब्रोजचे केस वाढवण्यास मदत होईल.

वरचे जास्तच केस पिकलेत? जास्वंदाच्या फुलाचा १ उपाय; डाय न लावता काळेभोर-दाट होतील केस

४) कढीपत्ता नारळाच्या तेलात घालून हे तेल व्यवस्थित शिजवून  घ्या. या तेलाने रोज रात्री आयब्रोजची मसाज केल्याने केसांची ग्रोथ चांगली होईल. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी