Join us

१ चमचा तांदूळ, चिमूटभर मुगाची जादू; डागविरहीत, ग्लोईंग दिसेल डल, काळपट झालेला चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 16:52 IST

How to get Spotless Glowing Skin : तांदळांचा वापर करून तुम्ही कमीत कमी खर्चात ग्लोईंग, चमकदार चेहरा मिळवू शकता.  

वातावरणातील बदल तर कधी केमिकल्सयुक्त उत्पादनांच्या वापरानं चेहऱ्यावर पिंपल्स येतात. पिग्मेंटेशन रिमुव्हींग क्रिम्सचा वापर केला तरी हवातसा बदल झालेला दिसत नाही. पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंट्सनी हे डाग काही वेळासाठी जातात पण पुन्हा तसाच चेहरा होतो. चेहरा टवटवीत दिसण्यासाठी, काळे डाग काढून टाकण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. (How to get Spotless Glowing Skin)

तांदूळ आपल्या प्रत्येकाच्याच घरात असतात. याच तांदळांचा वापर करून तुम्ही कमीत कमी खर्चात ग्लोईंग, चमकदार चेहरा मिळवू शकता.  हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जास्त साहित्य लागणार नाही. अगदी कमीत कमी खर्चात तुमचं काम सोपं होऊ शकतं. 

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी प्रत्येकी एक चमचा बदाम,  मूग, तांदूळ,  बेसनाचं पीठ एकत्र करून त्याची पावडर बनवा. हे मिश्रण एका हवाबंद डब्यात स्टोअर करा नंतर एक चमचा हे मिश्रण वाटीत घेऊन त्यात दही मिसळा. हे मिश्रण चेहऱ्याला लावून १० मिनिटं चेहरा तसाच ठेवा आणि नंतर चेहरा स्वच्छ धुवा. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी